बार्डीतील समाजबांधव समाधीचे दर्शन घेण्यासाठी भिवडीला रवाना
भारतातील आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती,
पंढरपूर ---
तालुक्यातील बार्डी येथे मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यावेळी जमलेल्या लहान थोरांना रमेश चव्हाण यांनी उमाजी नाईक यांचा जीवनपट सांगितला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, उमाजी नाईक हे भारतातील आद्य क्रांतिकारक होते .१७९१ साली त्यांचा जन्म झाला. इंग्रज सरकारविरोधात बंड पुकारणारे आणि सशस्त्र क्रांती घडवून आणणारे ते पहिले क्रांतिकारक होते. इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांती घडवून आणणाऱ्या या क्रांतिकारकास, इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनावली. ३फेब्रुवारी १८३२ साली त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली , त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. अशा 'भिवडी' या ठिकाणी त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी बार्डीतील समाज बांधवांना घेऊन चाललो आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी विजय चव्हाण, नाना चव्हाण, नवनाथ चव्हाण , जालिंदर चव्हाण, पोपट जाधव , शरद चव्हाण, बाळासाहेब चव्हाण ,लक्ष्मण चव्हाण ,शंकर चव्हाण, सागर चव्हाण ,रणजीत चव्हाण, उमेश चव्हाण, रमेश चव्हाण, शिवम चव्हाण, गौरव चव्हाण आणि सिद्धार्थ चव्हाण आदी समाजबांधव उपस्थित होते.