विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपामध्ये भजन, प्रवचन,कीर्तन ,नाम संकीर्तन सेवेची बंदी हटवली --- प्रांताधिकारी गजानन गुरव

 मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची माहिती


पंढरपूर ---(विनोद पोतदार)
विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपामध्ये वर्षानुवर्षे कार्यक्रमाव्यतिरिक्त भजन कीर्तन करताना स्पीकर लावण्यास मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मनाई केली होती.पंढरपूर व महाराष्ट्रातील वारकरी फडकरी मंडळीतून याबाबत तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर हा निर्णय काल मागे घेण्यात आला असून सभा मंडपातील परंपरागत सुरू असणारे भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम स्पीकरसह परवानगी देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव यांनी दिली.
याबाबत पक्षीय संघटना व वारकरी संघटना यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देताच सभामंडपामध्ये स्पीकरसह भजन कीर्तन करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली गेली . कित्येक वर्ष श्री विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात भजन कीर्तन प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रम परंपरेने चालू आहेत.अशा ठिकाणी स्पीकर लावला जातो. याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव यांनी परंपरागत आलेल्या कार्यक्रमांना छेद देत सभा मंडपात भजन कीर्तन कार्यक्रम करण्यास मनाई केली.
         मंदिर समितीनेच सन 2019 मध्ये या संदर्भातील ठराव केला असून त्याची अंमलबजावणी आपण करीत असल्याचे श्री गुरव यांनी सांगितले होते. सभा मंडपातील भजन कीर्तन बंद झाल्याने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, वारकरी संघाचे संस्थापक राणा महाराज वासकर ,रामकृष्ण महाराज वीर , तसेच ह.भ.प.गणेश महाराज शेटे,ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे आदी महाराज व वारकरी संप्रदायातील अनेकांनी याबाबत तिव्र शब्दात विरोध केला तर काहींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे लेखी निवेदन (ओनलाइन)देऊन तक्रार केल्या होत्या, पंढरपूर शहरातही यांचे तिव्र पडसाद उमटले होते याचं दरम्यान 
 राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई हे काल पंढरपूर येथे काही कामानिमित्त आले असता ते शासकीय विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, किशोर जाधव, भाऊसाहेब शिंदे-नाईक, इत्यादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन मंदिरातील विषयाकडे लक्ष वेधून सभामंडपामध्ये पूर्वत असलेले स्पीकर लावण्याची परवानगी देण्याची मागणी आक्रमकपणे व्यक्त केली होती.
मंत्री देसाई यांनी त्यांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनास सूचना देण्यात येथील असे सांगितले होत. याबाबत आमच्या प्रतिनिधीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव यांच्याकडे माहिती घेतली असता ते म्हणाले की 2019 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सभामंडपातील भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या वेळी स्पीकर वापरण्यास मनाई करण्याविषयीचा ठराव केला होता.
त्यानंतरच्या दोन वर्षाच्या काळात कोविडच्या कारणामुळे कार्यक्रम झाले नव्हते.आता ते कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत मंदिर समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आपण सूचना दिल्या होत्या तथापि या संदर्भात वारकरी मंडळीतून ज्या प्रतिक्रिया येऊ लागल्या त्या पाहून आपण मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहीनाथ महाराज औसेकर व त्यांच्या सहकार्याची चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार जे पूर्ववत कार्यक्रम सुरू होतील ते स्पीकरसह करण्यास परवानगी दिली असल्याचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form