पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी होणारच--- दिलीप धोत्रे यांचा निर्धार

शेतकऱ्यांचा कोणताही प्रकार चे नुकसान होऊ देणार नाही 


पंढरपूर (विनोद पोतदार)---
 पंढरपूर तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला विषय म्हणजे औद्योगिक वसाहतीची निर्मिती पंढरपूर तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान सरकारही यास अनुकूल आहे. आता एमआयडीसी होणार आणि याचे श्रेय दुसऱ्याला जाणार, हे दिसताच जागेची निवड होण्याअगोदरच विरोध सुरू झाला आहे. हे दुसरे तिसरे काही नसून दुसऱ्याला श्रेय मिळू नये, यासाठी करण्यात आलेले राजकारण आहे. असा युक्तिवाद मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला. ते पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, कोळी महासंघाचे अरुण कोळी आणि मनसेचे शहराध्यक्ष संतोष कवडे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष, संजय बंदपट्टे, मनसेचे शशी पाटील आदी उपस्थित होते

एमआयडीसीमधील उद्योगाला परवानगी देताना, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सर्टिफिकेट लागते. प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्यानंतरच हे सर्टिफिकेट दिले जाते

बारामती पुणे सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या एमआयडीसीभोवती, शेती पिकवली जाते.

कोणत्याही परिस्थितीत पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी होणारच, असा निर्धार दिलीप धोत्रे यांनी बोलून दाखवला.

ना. उदय सामंत यांनी पुढाकार घेत, जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले. ठरल्याप्रमाणे सोमवारी औद्योगिक प्राधिकरणाचे पथक पंढरपूर तालुक्यात जागा पाहण्यासाठी आले. यावेळी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी, वाखरी, कासेगांव, आणि रांजणी 

 परिसरातील जागांची पाहणी करण्यात आली. यावेळी या पथकासोबत आ. समाधान आवताडे, मा.आ. प्रशांत परिचारक तसेच मनसे नेते दिलीप धोत्रे हे प्रमुख उपस्थित होते. यातील कोणतीही एक जागा, एमआयडीसी उभारणीसाठी ठरवण्यात येणार होती.

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला एमआयडीसीचा मुद्दा अनेक निवडणुकात राजकीय मुद्दा बनला होता. जागा पाहणीनंतर दोनच दिवसांनी कासेगावमधील शेतकऱ्यांनी, कासेगावात एमआयडीसी उभारू नये, असे सांगत, एमआयडीसी उभारण्यास विरोध केला. हे विरोधाचे लोन हळूहळू दुसऱ्या गावात पसरू लागले. एमआयडीसीमुळे शेती उद्योगास बाधा येते, असा समज शेतकन्यांमध्ये होऊ लागला. औद्योगिक प्राधिकरणाने अद्याप जागेबाबत कोणताही निर्णय घेतला नसूनही, हा विरोध करण्यात आला. यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा खुलासा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला.

पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसी उभारणीचे श्रेय दुसऱ्याला जाऊ नये, यासाठी हे षडयंत्र आखले जात आहे. यासाठी कासेगावमधील शेतकऱ्यांची आणि औद्योगिक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची बैठक लावली जाईल. एमआयडीसी उभारणीमुळे शेतकऱ्यांचा कोणताही प्रकारचे नुकसान होणार नाही, हे पटवून दिले जाईल, असा निर्वाळा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form