आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत आज आपण संपूर्ण देशामध्ये आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व आपल्या जिल्ह्याचे अभ्यासू मा. आमदार आदरणीय प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्या वतीने करकंब येथे महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे करकंब व पंचक्रोशीतील बांधकाम कामगारां च्या नावनोंदणीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी अभ्यासू व्यक्तिमत्व तरुणांचे आशा स्थान आदरणीय रोहनजी परिचारक साहेब यांनी ही योजना बांधकाम कामगारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा आरोग्यविषयक असेल अशा या योजनेच्या माध्यमातून कामगारांना मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे त्यामुळे ही योजना एका गावापूर्ती मर्यादित न ठेवता संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले व त्यासाठी सर्व मदत आपण करू असे सांगितले.
तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक सोलापूर जिल्हा भाजपा कामगार आघाडीचे सरचिटणीस मनोज पवार यांनी आपल्या मनोगता मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब व आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याच्या व देशाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवलेले आहेत या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आव्हान केलेले आहे व त्याच अनुषंगाने आज आपण करकंब येथे आजादी का अमृत महोत्सव व आदरणीय प्रशांतजी परिचारक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने या बांधकाम कामगार महामंडळाकडे बांधकाम कामगारांचे नाव नोंदणी शिबिराचे आयोजन केलेले आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या वेळी आपल्या मनोगत मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख भाजपाचे तालुका सरचिटणीस लक्ष्मीकांत वंजारी व पाटील सर यांनी ही योजना कामगारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने करकंब व पंचक्रोशीतील बांधकाम कामगारांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करून या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.तसेच सोलापूर येथील उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार महामंडळाचे कर्मचारी जगदीश पाटील व त्यांचे सहकारी यांनीही सर्व बांधकाम कामगारांना या महामंडळाकडे नोंदणी केल्यानंतर कामगारांना आठ्ठावीस प्रकारच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक योजनांचा फायदा होणार आहे असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करकंरबमधील सर्व इंजिनिअर राजाभाऊ देशमुख जगन्नाथ दुधाणे आनंद शिंगटे श्रीकांत गुळमे घोडके जाधव व महेश देशमुख व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संतोष जी पिंपळे ओबीसी मोर्चाचे तालुका सरचिटणीस राजेंद्र जी करपे सर करकंब शहराध्यक्ष महादेव कुलकर्णी रोहिदास चौगुले मिलिंद उकरंडे संतोष टकले सलीम बागवान विजय माळी प्रितम नकाते औदुंबर कुंभार केरबा पवार अनिल राकुंडे बाळु धोत्रे राहुल देवकते योगेश धोत्रे व पाडुरंग परिवारातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भिमा व्यवहारे सर यांनी केले तर आभार अभंगराव सर यांनी मानले.