पंढरपूर ---(विनोद पोतदार)
प्रा. शिवाजी सावंत यांच्यावर सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अधिकृत रित्या सोपवण्यात आल्यानंतर सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटास आधिक बळ मिळाले असून प्रा. शिवाजी सावंत यांना सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात संघटनात्मक बांधणी बरोबरच प्रत्यक्ष निवडणुकांच्या व्यूह रचनेचा त्यांचा अनुभवही मोठा आहे. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगर पालिका निवडणुकांच्या व्यूह रचनेचा त्यांचा अनुभवही मोठा आहे. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा संर्पक प्रमुख म्हणून प्रा.शिवाजी सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटास बळ देतील असाही विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्मथकांकडून व्यक्त केला जात आहे.