वेणुनगर,( विनोद पोतदार)
- वेणुनगर- गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बुधवार दिनांक २१.०९.२०२२ रोजी कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत धनंजय पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व आरोग्यम् धनसंपदा वेलनेस सेंटर, कुर्डुवाडी यांचेतर्फे कारखान्याचे सर्व कर्मचारी वर्गाचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणेत आले होते. सदर शिबीरादरम्यान वजन वाढल्यामुळे होणारे आजार व ते कमी करणेसाठी मार्गदर्शन देणेत आले. सदर शिबिरामध्ये ४५६ कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन औषधोपचाराचे मार्गदर्शन घेतले.
हे शिबीर यशस्वी होणेसाठी आरोग्यम् धनसंपदा वेलनेस सेंटर चे वेलनेस कोच श्री प्रसाद पाध्ये, सुहास भोंगळे, शंकर माने, वैशाली भोंगळे, डॉ. पुजा माने, डॉ. पुजा पाध्ये, डॉ. सुषमा जलमकर, डॉ. अजय गोरड यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर शिबिरास कारखान्याचे व्हा.चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे मॅडम, संचालक सर्वश्री दिनकर चव्हाण, जनक भोसले, सिध्देश्वर बंडगर, धनंजय काळे, नवनाथ नाईकनवरे, प्रविण कोळेकर, तुकाराम मस्के, दशरथ जाधव व सर्वश्री महेश खटके, विठ्ठल रणदिवे, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद यांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.