बागायतदार शेतकऱ्यांचा पत्रकार परिषदेत मागणी
२६ हजार लोकसंख्येच्या कासेगावात, १४हजार एकरावर फळबागांची लागवड आहे. १० ते १२ हजार जणांना यातून दररोज रोजगार मिळतो. गावात ४५ कृषीउद्योग सुरू आहेत,तर ९००ते१०००कोटी वार्षिक उलाढाल या गावाची असून कासेगावमधील ही कृषी वसाहत तालुक्याची मोठी असून या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभारल्यास प्रदुषण, हवामान, दुषित पाणी आदी येणाऱ्या अडचणी मुळे संपुष्टात येईल, औद्योगिक एम.आय.डि.सी.साठी ज्या सवलती शासनाकडून देण्यात येतात ,त्या कृषी उद्योग साठी द्याव्यात तसेच रोजगार हमी योजना सारख्या योजना, फळबाग प्रक्रिया योजना सुलभ करून बागायतदार शेतकरी यांच्या साठी सरकारने द्याव्यात . यासाठी मी दोन्ही आमदारांना विनंती करतो की आपण या सर्व बाबींचा विचार करावा.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ अध्यक्ष प्रशांत भैय्या देशमुख
पंढरपूर --- (विनोद पोतदार)
नियोजित पंढरपूर एमआयडीसी कासेगांवमध्ये नको ... असा पवित्रा कासेगांवमधील नागरिकांनी घेतला आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभा करून, येथील कृषी वसाहत उध्वस्त करू नका ... अशी मागणी येथील शेतकरी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
दोनच दिवसापूर्वी औद्योगिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर तालुक्यात येऊन, औद्योगिक वसाहतीसाठी संभाव्य जागांची पाहणी केली होती. कोर्टी, वाखरी, कासेगाव, अनवली रांजणी आदी ठिकाणच्या जमिनींची पाहणी करण्यात आली होती. यामुळे आता पंढरपूर एमआयडीसी लवकरच होणार, अशी आशा पंढरपूरवाशियांमध्ये निर्माण झाली होती.
परंतु बुधवारी कासेगाव येथील बागायतदार शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत, कासेगावमध्ये एमआयडीसी होण्यास विरोध दर्शवला आहे. तालुक्यात इतरत्र कोठेही हा प्रकल्प राबवावा, असे हात जोडून सांगितले आहे.पंढरपूर तालुक्यातील ९२गावे ही सिंचन क्षेत्रात मोडतात याचाही विचार व्हावा.दोन्ही आमदारांना याचा चांगलाच अभ्यास आहे.
कृषी औद्योगिक क्षेत्रात केंद्र व राज्य सरकार अनकुल असुन शासकीय योजना फळबाग, बागायतदार शेती यांसाठी असुन या पंढरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी यांच्या साठी या योजना राबविण्यात याव्यात.
आजमितीस कासेगांवमध्ये
८ हजार एकर द्राक्ष, ४ हजार एकर डाळिंब आणि उसाची लागवड २ हजार एकरावर आहे. यातून १० ते १२ हजार मजुरांना रोजगार मिळतो. या ठिकाणी आसपासच्या गावातून मजूर रोजगार मिळवण्यासाठी येतात. दरवर्षी ९०० ते १००० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल, या शेती उद्योगातून होते. औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषण होणार आहे .यामुळे फळबागेसारखी नाजूक पिके उध्वस्त होणार आहेत. साहजिकच येथील कृषी वसाहत संपुष्टात येणार असल्याची माहिती प्रशांत भैय्या देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली
पंढरपूरमध्ये घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजीत पाटील, माजी जि.प. सदस्य
हरिभाऊ गावंधरे , भास्कर मोरे, लालासाहेब देशमुख, रविंद्र तोडकर, सुनील गवळी, तुकाराम आप्पा कमकल, संतोष शेंडगे यांच्यासह कासेगाव मधील बहुतांश शेतकरी उपस्थित होते.