५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ शिक्षकांना अवॉर्ड
पंढरपूर: (विनोद पोतदार)
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मिञ, मार्गदर्शक व सल्लागार असतो. सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून भावी पिढी उत्कृष्ट पद्धतीने घडविण्याचे काम करत असल्याचे शिक्षकांना प्रेरणा मिळावी याचअनुशंगाने रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने पाच शिक्षकांना "नेशन बिल्डर अवॉर्ड" देण्यात आला असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
५ सप्टेंबर रोजी सिंहगड कॉलेज मध्ये रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरवाती विद्येचे आराध्य दैवत सरस्वती व डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. जयवंत महाराज बोधले उपस्थित होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या डॉ. प्रसाद कुलकर्णी, प्रा. ज्ञानेश डोंगरे, प्रा. दिपक इरकल, डॉ. सचिन लादे आणि प्रा. देविदास जगताप आदी शिक्षकांना रोटरी क्लब पंढरपूर यांचे वतीने शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन "नेशन बिल्डर अवॉर्ड" मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यादरम्यान प्रमुख पाहुणे ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, डाॅ. सचिन लादे, रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास रो.जयंत हरिदास, रो. मकरंद रत्नपारखी, रो. विनोद भाटिया उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अवंती कोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रोटरी क्लबचे सचिव सचिन भिंगे यांनी मानले.