श्री विठ्ठल कारखान्याच्या कामगारांच्या महिलांना रोजगार निर्मितीसाठी श्री विठ्ठल गारमेंटस यांचे मार्फत शिलाई प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन



पंढरपूर---- (विनोद पोतदार) : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कॉलनीमध्ये राहणाऱ्या व परिसरातील कामगारांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देणेसाठी मा. संचालक मंडळाने ठरविलेल्या धोरणानुसार श्री विठ्ठल गारमेंटस, वेणुनगर, ता. पंढरपूर ची स्थापना करण्यात आलेली असून त्या गारमेंटस्च्या वतीने सदर महिलांना शिलाई कामाचे प्रशिक्षण व रोजगार देणेसाठी आज कारखाना साईटवर माजी जिल्हाधिकारी मा. श्री गोकुळ मवारे साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी व मिटकॉनचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी श्री चंद्रकांत लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत संपूर्ण प्रशिक्षणाची माहिती देऊन लवकरात लवकर सदर गारमेंटस् मार्फत प्रशिक्षण चालू करणेचे जाहीर केले..

सदर वेळी मिटकॉनचे प्रतिनिधी श्री चंद्रकांत लोंढे म्हणाले की, वस्त्रोद्योग निर्मितीमध्ये सोलापूर जिल्हा हा कायम अग्रेसर असून रेडीमेड गारमेंटस्ला संपूर्ण देशामध्ये मोठी मागणी असून शालेय ड्रेसचेही काम हे सोलापूर जिल्ह्यात चालू आहे. रोजगार प्रशिक्षण अंतर्गत महिलांचा ग्रूप तयार करून त्या गटाला राज्य शासनाकडून सबसिडीही देणेत येते. तसेच रेडिमेड गारमेंटस् या उद्योगातून दिवसाला रु. ५००/- तर महिन्याला रु.१५,०००/ ते १८,०००/- रोजगार मिळू शकतो असे ते म्हणाले.


सदरवेळी माजी जिल्हाधिकारी श्री मवारे साहेब यांनी महिलांना मार्गदर्शन करून स्वयंम रोजगार निर्मितीपासून आर्थिक लाभ कसा मिळेल व आपण स्वयंपूर्ण कसे व्हाल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड म्हणाले की, रेडिमेड गारमेंटस् व्यवसायासाठी कारखान्याच्या वतीने शिलाई मशिनस्, जागा, लाईटसह इतर सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सदर प्रशिक्षणाची वेळ ही महिलांच्या सोईनुसार देण्यात येईल. तसेच प्रशिक्षणानंतरही महिलांना कामाची वेळ त्यांच्या सोईनुसार देण्यात येईल. सदरचे प्रशिक्षण कसे घ्यायचे व त्यापासून रोजगार निर्मिती करून आपले आर्थिक फायदे कसे होतील याबाबत विस्तृत माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

सदरवेळी कारखान्याचे संचालक श्री दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी सदर प्रशिक्षणासाठी मोलाचे मार्गदर्शन करून महिलांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा व कारखान्याच्या वतीने आपणास संपूर्ण मदत केली जाईल असे आवाहन केले.

तरी सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री सिध्देश्वर बंडगर, नवनाथ नाईकनवरे, बाळासो हाके, संभाजी भोसले, कालिदास पाटील, प्रविण कोळेकर, खटके तसेच अँड जक्कल मॅडम, गारमेंटस्चे संचालक श्री दिपक डुबल यांचेसह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form