मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन


पंढरपूर, दि. ०५:- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा तानाजी सावंत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

        यावेळी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते शाल, श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. 

         यावेळी प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माने, प्रा.शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form