६५ एकरालगतच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यास स्थानिकांचा प्रखर विरोध


पंढरपूर (विनोद पोतदार): 
पंढरपूरसाठीचा आधुनिक विकास आराखडा सोलापूरमध्ये जाहीर करण्यात आला. पंढरपूरमधील नागरिकांना याची कोणतीही कल्पना नव्हती. या आराखड्यात विकासाच्या नावाखाली ६५ एकरा शेजारील जमिनींचे अधिग्रहण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या परिसरातील स्थानिक नागरिकांनी तसेच शेतकरी, व्यापारी, मठाधिपती, वारकरी यांनी प्रखर विरोध केला आहे स्थानिक व सर्व बाधीत लोकांनी व संजय ननवरे यांनी  पत्रकार परिषद घेतली, आणि शासनाच्या भूमिकेवर माहिती दिली.

आमचा विकासाला विरोध नाही परंतु विकासाच्या आडून लोकांची घरेदारे उध्वस्त होणार असतील, आणि आराखड्यात अवास्तव विकासाच्या कल्पना असतील तर, तो आराखडा कदापिही खपवून घेतला जाणार नाही, शासनाच्या जागेतच ज्या काही योजना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या द्याव्यात अशी भूमिका समाजसेवक संजय ननवरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत ज्ञानेश्वर बोराटे, ज्ञानदेव बारले, राजू कनेरकर, श्याम महाराज उखळीकर माजी नगरसेवक रमेश कांबळे, माऊली बोराटे, श्रीकांत महाराज ठाकुर, प्रदीप बोराटे आदी महाराज मंडळींसह प्रतिष्ठित नागरिक संत साधु महाराज मठ येथे उपस्थित होते.
     ६५ एकरालगत अनेक विस्थापित शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या आहेत. ते अल्पभूधारक आहेत. त्यांच्या जमिनी हस्तांतरण करताना शासनाला मोठा विचार करावा लागणार आहे. यासाठी त्यांनी सरकारी जमिनीचा वापर करावा, आणि विकास साधावा अशी भूमिका संजय ननवरे यांनी व उपस्थितांनी आपली नविन आराखड्यासंदर्भात भुमिका मांडली आहे.
           
तत्कालीनजिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ६५ एकर परिसर विकसित केला होता. या ठिकाणी दिंडीकरी, फडकरी यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.परंतू प्रमुख वारी मध्ये यांचा वापर केला जातो त्यानंतर मात्र या परिसरात अनेक अवैध धंदे येथे सुरू असतात याचा प्रशासनांनी विचार करावा

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form