पंढरपूर ----
संत वाङमयाचे,वैदीक वाङमयाचे,मराठी लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक,
भारुड वाङमयांतील तत्वज्ञानावर आधारित हजारों एकपात्री प्रयोग सादर करणारे,
कीर्तनकार, प्रवचनकार भारूडकार,व्याख्याते,
बुद्धीजीवी,सु-शिक्षित वर्गालाही संतपंरपरेकडे,वाङमयांकडे प्रवृत करणारे,
तसेच श्रीज्ञानोबारायंच्या सोहळ्यांत आदर्श व शिस्तबद्ध दिंडिचे प्रणेते असणारे निष्ठावंत वारकरी,
हभप गुरुवर्य डाॅ.रामचंद्र अनंत देखणे सर(वय वर्षे ६५) आज श्रीपांडुरंगचरणी लीन झाले..
गतात्म्यास उत्तम सद्गती लाभो,
हिच श्रीविठ्ठलचरणी प्रार्थना..