पंढरपूर -----(विनोद पोतदार)
खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्यातील गाळप हंगाम २०२२-२३ था बारावा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ बुधवार दिनांक ०७/०९/२०२२ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता या शुभमुहूर्तावर ह.भ.प. मा.श्री. जयवंतराव बोधले महाराज यांचे शुभहस्ते तसेच पंढरपूरचे तहसिलदार मा. श्री. सुशिलकुमार बेल्हेकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच सिताराम महाराज साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक व धनश्री परिवाराचे संस्थापक मा.प्रा.श्री. शिवाजीराव काळुंगे, धनश्री मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ. शोभाताई शिवाजीराव काळुंगे, संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. शिवानंद पाटील, संचालक श्री. औदुंबर वाडदेकर, गोकुळ शुगरचे चेअरमन मा. श्री. दत्ता शिंदे. संचालक मा. श्री. समाधान काळे, मा. श्री. महादेव देठे, श्री. अविनाश पाटील, श्री. उध्दव बागल प्रा. माऊली जाधव, श्री. गणेश ठिगळे, श्री. रविकांत पाटील, श्री. रमेश भांजे श्री. सुरेश भोसले, श्री. बिभीषण ताड तसेच कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड, श्री. सुयोग गायकवाड, जनरल मॅनेजर श्री. हणमंत पाटील तसेच भागातील प्रतिष्ठित ऊ स उत्पादक सभासद शेतकरी, कर्मचारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये साडेपाच लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट असुन १० मेगा वॅट सहवीज निर्मिती प्रकल्पातुन तीन कोटी युनिट वीज एक्सपोर्ट होतील असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी सांगितले की, कर्मचा-यांनी स्वताच चांगले काम करुन चांगला पगारवाढ घ्यावयाचा आहे. तसेच सिताराम कारखान्याने वेळेत शेतक-यांना ऊस बिलाची रक्कम, तोडणी वहातुक रक्कम आणि कर्मचा-यांना पगार आदा करून ऊस पुरवठा शेतकरी, कर्मचारी व तोडणी वहातुक कंत्राटदार यांच्या विश्वासास पात्र झालेचे नमुद केले.
ह. भ. प. मा. श्री. बोधले महाराज यांनी आपले विचार प्रकट करताना म्हणाले की सिताराम महाराज साखर कारखान्याचे महिला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागील हंगामात उच्चांकी उस गाळप करुन कारखान्यातील सर्व कर्मचा-यांना सोबत घेवुन कारखाना चांगल्या प्रकारे चालविला याचे कौतुक केले. त्यांनी एकाच वर्षांमध्ये कारखान्याचे कामकाज सुयोग्यरित्या पार पाडुन कारखाना नावारुपास आणलेला आहे असे विचार व्यक्त केले.
अध्यक्ष पदावरुन बोलताना मा. श्री. सुशिलकुमार बेल्हेकर तहसिलदार पंढरपूर यांनी सिताराम कारखाना मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीसुध्दा चांगला गाळप हंगाम पार पाडेल अशा शुभेच्छा दिल्या. संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. शिवानंद पाटील यांनी अल्पावधीतच काळुंगे कुटुंबियानी साखर कारखान्यामध्ये नावलौकीक केल्याचे नमुद केले. गोकुळ शुगर्सचे चेअरमन श्री. दत्ता शिंदे यांनी कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदिनांस व गाळपास शुभेच्छा व्यक्त केल्या.
आभार प्रदर्शनामध्ये सिताराम साखर कारखान्याचे तसेच धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा प्रा. श्री. शिवाजीराव काळुंगे यांनी कारखान्यामध्ये ऊस पुरवठा शेतकरी व तोडणी वहातुक कंत्राटदार तसेच कर्मचारी यांचे हित जोपासले जाईल असे नमुद केले. धनश्री परिवाराप्रमाणेच सिताराम महाराज साखर कारखाना अल्पावधीतच नावारुपात आला आहे असे सांगितले.यावेळी टेक्नीकल जनरल मॅनेजर सुर्यकांत पाटील, मुख्य शेती अधिकारी पी. जी. शिंदे, शेती अधिकारी डी. एस्. रोकडे, चिफ केमिस्ट व्ही. एस्. नागणे, डेप्युटी चिफ इंजिनिअर एस. बी. रोंगे, फायनान्स मॅनेजर गुंडेवार, सिव्हील इंजिनिअर आर. एस. वायदंडे, पर्चेस ऑफीसर आर. एन. चेळेकर, स्टोअर किपर डी.जे. नागणे सुरक्षा अधिकारी माळी सर्व विभागाचे कर्मचारी तसेच पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला या भागातील प्रतिष्ठित व्यक्ती, उस पुरवठा शेतकरी सभासद व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशासन अधिकारी डी. एम. सुतार यांनी केले.