पंढरपूर येथे भव्य राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन.....स्वामी समर्थ मित्र मंडळ नागालँड चौक यांचा उपक्रम



पंढरपूर ---- येथील नागालँड चौक येथे स्वामी समर्थ मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक ६ व बुधवार दिनांक ७असे दोन दिवस चालणाऱ्या डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत, या स्पर्धे च्या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण म्हणून अभिनेत्री माधुरी पवार या उपस्थित राहणार आहेत.या डान्स स्पर्धा साठी प्रवेश फी म्हणून ५००रु ठेवण्यात आली आहे, या डान्स स्पर्धा चे पहिले बक्षीस विकी मालक थोरात यांच्यावतीने, ३१०००/- रुपये बक्षीस ठेवण्यात आले तर द्वितीय बक्षीस एकनाथ ननवरे यांच्याकडून २१०००/- रुपये बक्षीस ठेवण्यात आले तर तृतीय बक्षीस, ११०००/-रू शंकर माळी यांच्या तर्फे बक्षीस ठेवण्यात आले आहे,
    
  
 तसेच होम मिनिस्टर व संमिश्र संगीत खुर्चीचे बक्षीस दत्ताभाऊ दीक्षित यांच्याकडून देण्यात येणार आहे व लहान गटाकरिता प्रथम पारितोषक ज्योतीराम गोडसे यांच्याकडून ७०००/-रू बक्षीस ठेवण्यात आले आहे तर द्वितीय बक्षीस आकाश कौलवार यांच्याकडून ५०००/-रू बक्षीस देण्यात येणार आहे तर तृतीय पारितोषिक शुभम भोसले यांच्याकडून ३०००/-रू चे बक्षीस देण्यात येणार आहे.तसेच गुरुवार दिनांक ८ रोजी होम मिनिस्टर ध्यास स्वप्नाचा खेळ व संगीत खुर्ची या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून तनुजा पोखरकर व निवेदक म्हणून तन्मय चिखले हे उपस्थित राहणार आहेत, संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्याना प्रथम द्वितीय तृतीय पक्ष म्हणून तथास्तु पैठणी सोन्याचे नथ व चांदीचे पैंजण बक्षीस देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे आधारस्तंभ म्हणून नगरसेवक महादेव धोत्रे  व मार्गदर्शक बिल्डर धनु धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भैय्यासाहेब ठाकरे मित्रपरिवार व शुभम माने मित्र मंडळ व मंडळातील सर्व कार्यकर्ते हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी अधिक परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form