पंढरपूर ----श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली, सुरुवातीला सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या दिवसाच स्वरपुष्प सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब, सदानंद मगर व कलाकारांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली, सुरुवात वारकरी सांप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी ने वातावरण भक्तिमय झाले त्यानंतर रुप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान, विष्णू मय जग,पंढरी हे मुकुटमणी,देवीचा गोंधळ,ऐंशी लागी लगन,घागर घेऊन,हरहर शंभो,अशा अप्रतिम अभंगरचना गाऊन शेवटी हेचि दान देगा देवा भैरवी गाऊन सांगता केली, त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत शिवाजी आर्दड,हरिश गव्हारे, बाबासाहेब जाधव, मुकुंद जोशी,विठ्ठल दोरके, सुभाष गवळी,शरद जाधव यांनी अप्रतिम केली,निवेदन विक्रम बिस्किटे सरांनी केले,यावेळी पंढरपूर कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेशोत्सव संगीत यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत, ७ तारखेपर्यत अंजली नंदिनी गायकवाड, मुग्धा वैशंपायन,आनंद जोशी यांच्या रात्री ७:३० ते१०:००या वेळेत तुकाराम भवन येथे श्रवणीय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे