पंढरपूर----(विनोद पोतदार)
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा सन २०२२-२३ गळीत हंगामाचा ४१ वा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ सोमवार दिनांक २६.०९.२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता या शुभमुहर्तावर श्री संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज व श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहुचे माजी अध्यक्ष ह.भ.प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचे शुभहस्ते व होमहवन पुजन स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बी.पी. शेंगेसर व त्यांच्या सुविद्य पत्नी, कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मा. सौ. प्रेमलता रोंगे या उभयतांचे शुभहस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
याप्रसंगी ह.भ.प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांनी आपल्या अध्यात्मिक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्यामागे फार मोठी आध्यात्मिक शक्ती असून श्री विठ्ठल कारखान्याला अनेक साधू संताचे आशिर्वाद लाभले आहेत. कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील हे जनतेचे प्रश्न सोडविणेसाठी सतत प्रयत्नशिल असून त्यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना निश्चित प्रगतीपथावर राहील, असे त्यांनी सांगीतले व गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.
याचवेळी कारखान्याच्या नॅशनल हेवी या जुन्या मिलचे रोलर पुजन संचालक श्री प्रविण विक्रम कोळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, सौ सविता रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, कार्यलक्षी संचालक तुकाराम मस्के सर, एम.एस.सी. बैंक प्रतिनिधी सी. एस. पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. श्री अमर पाटील, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थिती होते.