पंढरपुरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरूण मंडळातर्फे नवरात्र निमित्त साकारले केदारनाथ मंदिर

अध्यक्षपदी निखील नेहतराव, सचिवपदी श्रीकांत शिंदे यांची निवड


पंढरपूर---(विनोद पोतदार)
पंढरपूर शहरातील संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळ व क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरूण मंडळ लक्ष्मी नगर यांची मार्गदर्शक  संतोष भाऊ नेहतराव,  अमोल नागटिळक  ,सुरेश नेहतराव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी नवरात्र महोत्सव 2022 च्या  अध्यक्षपदी निखील नेहतराव,  सचिवपदी श्रीकांत शिंदे, उपाध्यक्ष  अमोल परबतराव, खजिनदारपदी किरण माने यांची निवड करण्यात आली. दरवर्षी मंडळाच्यावतीने विविध प्रकारचे देखावे सादर केले जातात. यंदाचे खास आकर्षण केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये सोमवार दि.26 सप्टेंबर रोजी दुपारी 5 ते 10 पर्यंत घटस्थापना व भव्य मिरवणूक वर्सोवाचा राजा कोळी गीत, मंगळवार दि.27 रोजी दुपारी 5 ते रात्री 10 पर्यंत सांप्रदायिक भजनी सेवा मंडळ, बुधवार दि.28 रोजी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत मंगेश चितळे प्रस्तुत वसेकर आणि मंडळी डोंगरी म्युझिकल ऑर्केस्ट्रा नाईट, गुरूवार दि.29 रोजी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणारा कार्यक्रम मराठमोळा नादखुळा !, शुक्रवार दि.30 रोजी सायं.7 ते 8 भव्य महाआरती व सायं.8 ते रात्री 10 पर्यंत होम मिनिस्टर स्पर्धा, शनिवार दि.1 ऑक्टोंबर रोजी सायं. 6 ते रात्री 10 पर्यंत राज्यस्तरीय रेकॉर्ड  डान्स स्पर्धा भाग 1, रविवार दि.2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत मेहंदी व रांगोळी स्पर्धा व सायं. 6 ते रात्री 10 पर्यंत राज्यस्तरीय रेकॉर्ड  डान्स स्पर्धा भाग 2, सोमवार दि.3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 5 पर्यंत भव्य रक्तदान शिबीर, सायं. 6 ते रात्री 10 पर्यंत राज्यस्तरीय रेकॉर्ड  डान्स स्पर्धा भाग 3, मंगळवार दि.4 ऑक्टोंबर रोजी सायं. 6 ते रात्री 10 पर्यंत राज्यस्तरीय रेकॉर्ड  डान्स स्पर्धा अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ सामाजिक गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. त्यानंतर बुधवार दि.5 ऑक्टोंबर विजयादशमी तसेच दरररोज सायंकाळी महाप्रसादाचे वाटप होणार आहे तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष वसंतराव बाबुराव नेहतराव यांनी केले आहे.
        
        
       राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये ग्रुप डान्स (मोठा गट), सोलो डान्स (मोठा गट), गु्रप डान्स (लहान गट), सोलो डान्स (लहान गट) या स्पर्धेचे निकष 1) नृत्य 2) गाण्याची निवड, 3 वेशभुषा, 4) हावभाव, 5) स्टेज कव्हर या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असणार आहेत याबाबत मंडळाशी संपर्क साधावा. तसेच सर्व स्पर्धकांनी आपली नांव नोंदणी दि.30/9/2022 तारखेपर्यंत करावी. सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र देण्यात येईल तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना गौरवपत्र देण्यात येईल. तसेच सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून दि.4 ऑक्टोंबर रोजी सामाजिक गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात  येणार आहे.
वरील सर्व कार्यक्रमांसाठी  श्रीमंत गाजरे, शंकर खरात,रत्नाकर पिसे, अमित नेहतराव, ज्ञानेश्वर नेहतराव, आकाश नेहतराव, ऋषिकेश रायबान, साहिल नेहतराव, सोहम नेहतराव, उल्हास कदम,किरण माने,सचिन अटकळे, सचिन नेहतराव आदि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form