पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात
शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे घटस्थापना पूजा करुन उत्सवास सुरुवात झाली यानिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये फूलांची आकर्षक सजावट, तसेच विविध सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन केले आहे.
तर रुक्मिणी सभा मंडपात पंढरपूर शहर व परिसरातील विविध महिला भजनी मंडळ हि दुपारच्या सत्रात भजनाचा व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
घटस्थापने निमित्त शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.या नवरात्र उत्सवात महिलांचा सहभाग मोठा उत्साहाने असतो मंदिर समितीवतीने देखिल दररोज विषेश कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .नऊ दिवस असणार्या या उत्सवात पारंपरिक पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पडतात.
नवरात्र म्हणजे शक्तिची उपासना नवरात्र म्हणजे शक्तिची उपासना करण्याचे दिवस होय, नवरात्रीच्या दिवसात वाईट विचारांवर विजय मिळवला पाहिजे. महिषासुराचे मायाजाळ ओळखून त्याच्या राक्षसी कृत्यापासून मुक्त होण्यासाठी दैवी शक्तिची आराधना करणे आवश्यक आहे. संपूर्ण नऊ दिवस अखंड दीपज्योत लावून देवी जगदंबेची पूजा करून तिची शक्ति प्राप्त करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र होय. प्राण्यांत रमणारा, सुखात राहणारा ,आणि महिष म्हणजे रेडा. रेड्यासारखी वृत्ती असणारा, राक्षस म्हणजे महिषासुर होय. रेडा नेहमी आपले सुख पाहात असतो. समाजात आजही रेड्यासारखी प्रवृत्ती वाढताना दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे समाज स्वार्थी आणि भावनाशून्य बनला आहे. समाजात व्यक्तिवाद आणि स्वार्थीपणाची अमर्याद वाढ झाली असून तो महिषासुरच्या रूपाने नांदत आहे. या महिषासुराला बांधून ठेवण्यासाठी देवीकडे शक्ती मागण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
अनंत काळापासून दैवी विचारांवर राक्षसी विचार आक्रमण करत आले आहेत. या विचारांवर संकट आहे तेव्हा देवांनी भगवंताकडे शक्ति मागून राक्षसी प्रवृत्तीचा सर्वनाश केला. केवळ चांगले विचार असून चालत नाहीत तर त्या विचारांचे रक्षण करणे गरजेचे असल्यामुळे शक्ति उपासना करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आळस झटकून शक्तिच्या उपासनेला सुरवात केली पाहिजे.