भीमा आणि नीरा नदीला महापूर सदृश्य स्थिती असणार आहे
पुणे ----
जिल्ह्या व संपूर्ण परिसरात काल 15 सप्टेंबर पासून तुफान पर्जन्यवृष्टी चालू आहे ,त्यामुळे उजनी धरणाच्या वरील असलेल्या 19 धरणापैकी कांही मोठ्या व लहान धरणातून एकूण 80 ते 85 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी खाली सोडून देण्यात आले आहे असे सिंचन विभाग पुणे येथून कळवण्यात येत आहे . हे पाणी आज १६ रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत दौंड येथून उजनी धरणात येणार असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण विभाग यांचेकडून कळवण्यात आलेली आहे.
16 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता उजनी धरणातून 70 हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे, आज १६ रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात ८० ते ९० हजार क्युसेक्स पर्यंत पाणी सोडावे लागेल असा धरण नियंत्रण विभागाचा अंदाज आहे कारण उजनीच्या वरील धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. ** तसेच वीर धरणातून नीरा नदीत 35 हजार क्युसेक्स विसर्ग आज १६ रोजी सकाळी 11:00 वाजलेपासून सोडण्यात आलेला आहे . एकंदरीत हे सर्व पाणी आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते 12 वाजण्याच्या पुढे किंवा उद्या 17 सप्टेंबर रोजी शनिवारी पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत नरसिंगपूर येथील निरा भीमा संगमा पासून पुढे भीमा नदीत किमान १ लाख ४० हजार क्युसेक्स विसर्गाने प्रवाही होणार आहे , त्यामुळे भीमा आणि नीरा नदीला महापूर सदृश्य स्थिती असणार आहे., या मुळे नदीकाठच्या शहरांनी व गावांनी अतिशय सतर्क रहावे असा इशारा देण्यात येत आहे . जलसंपदा विभाग सोलापूर ,धरण नियंत्रण विभाग भिमानगर ,धरण नियंत्रण विभाग निरा खोरे- विर धरण व पूर नियंत्रण विभाग येथील सर्व वरिष्ठ ,कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी अतिशय सतर्कतेने आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडत आहेत.