जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती पंढरपूर यांच्या वतीने लोटस इंग्लिश स्कूल पंढरपूर येथे 49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लिंगेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी भाले समर्थक मोहन इयत्ता आठवी व निरंजन समाधान भोसले इयत्ता आठवी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पवन ऊर्जा या उपक्रमास लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
यशस्वी विद्यार्थ्यास श्री साखरे, खामकर, येवारे, श्रीमती ननवरे यांचे मार्गदर्शन लाभले. शाखेचे मुख्याध्यापक वाघमारे आर. एस. रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, सहसचिव राजेंद्र साळुंखे, विभागीय अधिकारी सुरेश कुमार गोडसे स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राजू गावडे विठ्ठल पाटील अनंता विठ्ठल प्रभाकर गावडे सिद्राम नाना व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.