सिंहगड पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात माती परीक्षण या विषयावर व्याख्यान संपन्न

पंढरपूर --(विनोद पोतदार)
 एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी माती परीक्षण या विषयावर व्याख्यान दि. २४/०९/२०२२ रोजी आयोजित केले होते. यामध्ये *अभियंता अमित दाते* यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी माती परीक्षण पद्धती कसे वापरायच्या हे सांगितले. हे व्याख्यान ऑनलाइन पद्धतीने पार पडले अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली. या व्याख्यानात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील 80 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्राप्ती वेळापूरकर हिने केले. अभियंता अमित दाते यांचे स्वागत डॉ. श्रीगणेश कदम व प्रा. सुजीत राठोड यांनी केले. या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे आभार कुमारी प्राप्ती वेळापूरकर हिने मानले.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form