सभासदांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील - अँड. गणेश पाटील

यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


भोसे (प्रतिनिधी) : 
    कै. यशवंतभाऊ व कै. राजूबापू पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शाने व रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने संस्थांची वाटचाल सुरु असून सभासद व संस्था यांच्या हिताला कोणतीही बाधा येणार नाही अशा पद्धतीने कारभार केला जाईल असे अभिवचन सरपंच तथा संस्थांचे मार्गदर्शक अँड. गणेश पाटील यांनी दिले.  
भोसे ता. पंढरपूर येथे यशवंतभाऊ पाटील पतसंस्था, भोसे सोसायटी नं.१ व २ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले संस्थेच्या कामकाजात कोणतेही राजकारण न आणता  सोसायटी नं. ३ मधील ज्या सभासदांना कर्ज मिळाले नाही त्या सभासंदांचेही क. म. मंजूर करून घेतले असल्याची माहिती दिली 


 यावेळी सोसायटी अध्यक्ष रावसाहेब पाटील, बंडू गावडे, पतसंस्था अध्यक्ष जयवंत गावंधरे, संचालक शहाजी पाटील, कृषिराज शुगरचे संचालक शेखर पाटील, उपसरपंच भारत जमदाडे, विश्वनाथ भिंगारे उपस्थित होते. यावेळी विश्वनाथ भिंगारे यांनी अँड. गणेश पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झालेबद्द्ल सत्कार करण्याचा ठराव मंजूर करण्याची मागणी केली. 
यावेळी यशवंतभाऊ पतसंस्थेचा अहवाल वाचन जयवंत गावंधरे यांनी, सोसायटी नं. १ चा अहवाल वाचन सचिव भिवा वगरे व सोसायटी नं. २ चा अहवाल वाचन सचिव सुनील तळेकर, संचालक विजय कोरके, नितीन कोरके यांनी केले. यावेळी शाखाप्रमुख नागनाथ भांडे, दिलीप पवार, बाळासाहेब जमदाडे, नारायण कोरके, सोमनाथ थिटे, विठ्ठल कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के, नितीन खटके, भारत कोरके, प्रा. महादेव तळेकर आदि उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form