रूक्मिणी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा दि.28/8/22 रोजी रूक्मिणी विद्यापीठ येथे झाली. सदर सभेची सुरूवात रूक्मिणी मातेच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी बँकेचे मार्गदर्शक विजयसिंह पवार, चेअरमन सौ.सुनेत्राताई पवार, साळुंखे मामा, ज्येष्ठ सभासद रामहरी देठे यांचे हस्ते संपन्न झाली.
रूक्मिणी परिवार व रूक्मिणी बँक यांनी सामाजीक बांधीलकी जोपासत या चालू अहवाल सालात व कोरोना काळात दिवंगत झालेल्या मा.विनायक मेटे (शिवसंग्राम नेते), विजयालक्ष्मी पवार, मार्गदर्शक विजयसिंह पवार यांच्या मातोश्री व विविध क्षेत्रात दिवंगत झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
मा.गुरूवर्य साळुंखे सर, शेवाळे सर,नागनाथ चव्हाण,सुभद्रा पांढरे मॅडम, वसुधा कुंभार मॅडम, सविता लोखंडे, भोसले वकील देशमुख काका, संजय कोकाटे,जाधव साहेब,उमेश ढवळे,डॉ.भिमराव पाटील,डॉ.सुनिता पाटील, संगीता पाटील व इतर मान्यवरांचे सत्कार मा.विजयसिंह पवार,अमित शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.तसेच सभासद पाल्य कु.लक्ष्मी शिगुकर या विद्यार्थीनीनी सौ.सुनेत्राताई पवार यांचे हुबेहुब स्केच तयार करून चेअरमन यांना भेट दिली.यावेळी तिच्या विशेष सत्कार व कौतुक मा.सौ.सुनेत्राताई पवार यांचे हस्ते करण्यात आला.
सदर प्रसंगी सौ.सुनेत्राताई पवार यांचा सत्कार नंदीनी गायकवाड यांचे हस्ते करण्यात आला. तर मार्गदर्शक विजयसिंह पवार यांचा सत्कार साळुंखे साहेब यांनी केला. तर बँन्केस सहकार व विविध उपक्रमात सक्रिय भाग घेऊन बँकेस नफा मिळवून देणारे सत्यवान कापसे साहेब यांचा सत्कार मा.विजयसिंह पवार साहेब यांनी केला.
या प्रसंगी बोलताना सौ.सुनेत्राताई म्हणाल्या की,आपली बँक प्रगतीपथावर असून संस्थेच्या नवीन शाखासाठी परवानगी मागणीचे काम चालू आहे. बँकेच्या माध्यमातून प्रत्येकाला मदत केली आहे. अनेकांचे संसार उभे राहिले आहेत.आपल्या बँकेची 27 वर्ष पुर्ण झाली असून आतापर्यत कुठल्याही ग्राहकांची तक्रार आली नाही असे त्या म्हणाल्या. कर्जदारांनी आपले कर्ज वेळेत भरावे, एकमेकांकडे बघून कर्ज थकित ठेऊ नये, बँकेचे कर्ज वेळेत भरणार्या सभासदांना व्याजात 2% सवलत दिली जाते यांचा फायदा अनेकांनी घेतला आहे.व नवीन कर्जदारांनीही घ्यावा, सभासदांनी आपल्या ठेवी आपल्या बँकेत ठेवाव्यात, शेअर्स मध्येही वाढ करावी. ठेवी ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना प्रवृत्त करावे.सदर बँकेचे 17 संचालक आहेत. एकुण सभासद 2384 आहे.भागभांडवल 1 कोटी 44 लाख 26 हजार आहे.स्वनिधी 4 कोटी 44 लाख 26 हजार आहे. कर्जपुरवठा 23 कोटी 43 लाख 92 हजार इतका आहे. बँकेची गुंतवणुक 9 कोटी 31 लाख 77 हजार आहे. तर बॅँकेत ग्राहकांना अनेक सोयी पुरविल्या जात आहे. बँकेत लॉकरची सोय उपलब्ध आहे. यावेळी त्यांनी बँकेस सहकार्य करणारे अधिकारी,आर.बी.आय. अधिकारी,ग्राहक,सभासद,ठेवीदार यांचे आभार मानले.
यावेळी साळुंखे सर बोलताना म्हणाले की सन 1996 रोजी संस्था अगदी छोट्या स्वरूपात झाली होती,त्यांचा आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. बँकेचे ब्रीद वाक्य ‘ जनकल्याणा दक्ष, रूक्मिणीचा कल्पवृक्ष ॥ या वाक्याप्रमाणेच बँकेनी प्रगती साधली आहे. तर बँकेचे मार्गदर्शक विजयसिंह पवार बोलताना म्हणाले की एका व्यक्तिने मला विचारले की लक्ष्मी व सरस्वती एकत्र कशा काय नांदतात त्यावर ते म्हणाले आयुष्यात चांगले काम केल्यावर सर्व गोष्टी साध्य होतात. आणि प्रत्येक व्यक्तिने आयुष्यात चांगले काम करावे.म्हणजे कुठल्याही कार्यात अडचणी येत नाहीत. आमच्या संस्थेला रूक्मिणी पांडुरंगाचा आशीर्वाद ्रअसल्यानेच सरस्वती व लक्ष्मी या ठिकाणी एकत्र नांदत आहेत. त्यामुळेच रूक्मिणी परिवार प्रगतीकडे झेपावत आहे.
प्रास्ताविक बँकेचे व्यवस्थापक भोसले, तर आभार प्रदर्शन लोखंडे मॅडम यांनी केले. यावेळी सर्व संचालक,सभासद, ठेवीदार,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.