आयकरच्या चौकशीत काहीही आढळलं नाही----अभिजित पाटील
पंढरपूर - अभिजीत पाटील यांच्या चारही साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाड टाकली. मात्र आयकरच्या चौकशीत काहीही आढळलं नाही. मी माझ्या प्रामाणिक पणावर पैसा जमवला आणि कारखाने उभे केले, असा दावा अभिजित पाटील यांनी केला.
रविवारी रात्री पाटील यांच्या कारखान्यांची तसेच त्यांची इतर चौकशी पूर्ण झाली. मी तर या सर्व प्रकरणात निर्दोष आहे आणि तसं चौकशीतूनही दिसून आलंय, ज्या विरोधकांनी हे षडयंत्र रचलंय, त्यांची नावं योग्य वेळी उघड करेन,
असा इशारादेखील अभिजीत पाटील यांनी दिलाय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात मी मिळवलेला विजय विरोधकांना पचला नाही, त्यामुळेच हा कट रचला गेल्याचा आरोप पाटील यांनी केला.
भाजप नेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर व अभिजित पाटील यांची सदिच्छा भेट
भाजप नेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर व गोपीचंद पडळकर पंढरपूर येथे विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी ते म्हणाले की
मराठी युवा उद्योजक, चांगला मित्र म्हणून मी आज पंढरपूर मध्ये आल्यानंतर आवर्जून अभिजीत पाटील यांची भेट घेतली येथे आल्यानंतर मला कळले की आयकर विभागाने त्यांची चौकशी सुरू केली आहे तपास यंत्रणा या त्यांचं काम करीत असतात, त्यामुळे माझी भेट ही मैत्रीपूर्ण भेट असून एक मराठी उद्योजक मोठा होत असेल तर त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहणार असे पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकरनीं सांगितले, तसेच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिली .