सोमवार रोजी पंढरपूर मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर यांच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विक्रमी अशा २२७५फूट तिरंगा ध्वज पदयात्रा रॅलीचा आयोजन द. ह.कवठेकर प्रशाला येथून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेचे पक्षनेते मा.ना.श्री. प्रवीण जी दरेकर व पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार मा.समाधान दादा आवताडे आणि जिल्ह्याचे माजी आमदार मा. प्रशांत मालक परिचारक या मान्यवर मंडळींनी आपल्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास हिरवा कंदील दिला. यावेळी प्रशालेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
या भव्य तिरंगा ध्वज रॅलीचे उद्घाटन विधानपरिषद पक्षनेते मा.ना.श्री. प्रवीण जी दरेकर, मा.श्री.आमदार समाधानदादा आवताडे व आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी श्री.विठ्ठल चे चेअरमन अभिजित पाटील, प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर, शशिकांत नाना चव्हाण, सुभाष मस्के, माऊली हळनवर, सुदर्शन यादव, भैयासाहेब कळसे, लखणराज थिटे व विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.