१९ वर्षाखालील संघात खेळणार एन एस अकॅडमी मधील मुली
पंढरपूर (विनोद पोतदार) - सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत झालेल्या १९ वर्ष वयोगटाखालील मुलींच्या निवड चाचणीमध्ये शहरातील एन एस अकॅडमीच्या ३ मुलींची निवड झाली आहे.
सोलापूर येथील भंडारी स्पोर्ट्स अकॅडमी येथे घेण्यात आलेल्या या जिल्ह्याच्या मुलींच्या संघामध्ये पंढरपूरच्या एन एस क्लबची कु मयुरी थोरात, कु भक्ती पवार व स्नेहा शिंदे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा स्पर्धेत या पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील मुली सोलापूर जिल्ह्याकडून १९ वर्षाखालील संघातून क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहेत.
या सर्वांचे एन एस अकॅडमीचे प्रशिक्षक नागेश साळुंखे यांनी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच निवड झालेल्या खेळाडूंच्या पालकांनीही अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे