पंढरपूर --- (विनोद पोतदार)
प्राचीन काळपासून निसर्गोपचार पध्दतीचा अवलंब केला जात आहे. सकस आहार, व्यायाम व निसर्गोपचार पद्धतीचा मनुष्याच्या जीवनात वापर होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आयुष भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.अमीर मुलाणी यांनी केले.
पंढरपूर येथे आयोजीत निसर्गोपचार तज्ञांच्यावतीने निसर्गोपचार तज्ञांचे संमेलन घेण्यात आले. यावेळी डाॅ.आनंद भोसले, राष्ट्रीय प्रवक्ते,आयुष भारत, डाॅ.विश्वास वाघमारे, प्रदेश अध्यक्ष,आयुष भारत, व पंढरपूर मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, माढा, माळशिरस, येथील निसर्गोपचार, योगा तथा पंचगव्य तज्ञ उपस्थित होते.
‘एक मेका साह्य करु अवघे धरु सुपंथ’ या उक्तिप्रमाणे निसर्गोपचार तज्ञ यांनी एकञ येऊन एकमेकांना सहाय्य करावे. काही अडीअडचणी असतील तर सोडवाव्यात असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन डाॅ.सचिन सावंत यांनी केले होते.मान्यवरांचे सत्कार डाॅ.प्रकाश पवार, डाॅ.रवी वाळके, व डाॅ.सचिन सावंत यांनी केले. सुञसंचालन डाॅ.नंदिनी रानरुई तर स्वागत व कार्यक्रमाविषयी माहिती डाॅ.ज्योती शेटे यांनी दिली