गोगलगायींच्या प्रादुर्भावाने द्राक्षबागा संकटात

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत तहसीलदार निवेदन



पंढरपूर -- (विनोद पोतदार) कोरोना काळात द्राक्ष बागा पिकल्या पण विकल्या नाहीत. यानंतर अतिवृष्टीने वाया गेल्या. आता तिसऱ्या वर्षी गोगलगायींनी द्राक्ष बागांवर आक्रमण केले आहे. गोगलगायकडून पांढऱ्या मुळ्याच खाल्ल्या जात असल्याने, बागा उध्वस्त होत आहेत. याबाबत तात्काळ पंचनामे करून द्राक्ष बागायतदारांना मदत देण्यात यावी, अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदार संघटनेकडून करण्यात आली आहे. यावेळी मा. आ. प्रशांत परिचारक हेही उपस्थित होते.

द्राक्ष बागायतदार मोठे संकट आले आहे. पंढरपूर तालुक्यात १५०० एकरांवर द्राक्ष बागांची लागवड आहे 



पंढरपूर तालुक्यातील द्राक्षबागेत गोगलगायकडून पांढऱ्या मुळ्यांवर ताव मारला जात आहे. वरून हिरव्यागार दिसणाऱ्या  द्राक्षबागांचे नुकसान तालुक्यात झाले आहे. यासाठी शासनाने मदत करणे गरजेचे आहे अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघटनेकडून होत आहे



द्राक्ष बागायतदार संकटात सापडले आहेत. तात्काळ पंचनामे करून द्राक्ष बागायतदारांना मदत देण्यात यावी, अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील द्राक्षबागायतदार करीत आहे. याबाबत द्राक्ष बागातदार संघटनेकडून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना  निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी व तलाठी यांना त्वरित याबाबत सूचना देऊन पंचनामे करणार असे तहसीलदार साहेबांनी शब्द दिला आहे

,  संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे , सुभाष मस्के, विक्रम शिरसाट , माऊली हळणवार,  आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form