नागरी हिवताप योजना, पंढरपूर आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने उपक्रम
पंढरपूर----
नागरी हिवताप योजना पंढरपूर आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने माहे ऑगस्ट २०२२ मध्ये पारेषण कालावधीत डेंग्यू, चिकुनगुन्या, हिवताप किटकजन्य आजार इत्यादी प्रतिबंधासाठी व प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी मा. प्रांतधिकारी, मा. मुख्यधिकारी, मा. जिल्हा हिवताप अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार पंढरपूर शहरात डास अळी नाशक फवारणी, कंटेनर्स तपासणी (पाणी साठे), धूर फवारणी, गप्पी मासे सोडणे, करोना संशयित रुग्णांची घरे निर्जंतुकीकरण करणे इत्यादी. प्रभाग निहाय कार्यक्रम दि. २४ ऑगस्ट २०२२ अखेर महिन्यात किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी व करोना प्रतिबंधासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
माहे ऑगस्ट मध्ये पंढरपूर शहरातील १ ते १७ प्रभागामध्ये तसेच सर्व मठांमध्ये आरोग्य सेवक, क्षेत्र कर्मचारी यांचे टिमव्दारे व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत ताप रुग्ण, कंटेनर सर्वेक्षण, धूर फवारणी, गप्पी मासे सोडणे करोना दुषित रुग्णांची घरे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहेत किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी सर्व घरातील पाणीसाठे तपासण्यात आले यामध्ये ११२७८ घरामध्ये ८८२ घरे डास अळीसाठी दुषित आढळून आले तर एकूण ३०२६६ कंटेनरची (पाणी साठे) पडताळणी केली असता २९१ कंटेनर एडीस डास अळी साठी दुषित आढळून आली. पंढरपूर शहरातील डेंग्यू संशयित व डेंग्यू दुषित रुग्णाचे रक्त नमुने घेण्यात आलेले आहेत. तसेच पावसाळयामुळे जागोजागी पाणी साठल्याने जी डबकी तयार होतात त्या डबक्यावर व गटारी वरती डास अळी नाशक फवारणी करण्यात आली. तसेच प्रौढ डास नियंत्रणासाठी शहरातील
व उपनगरातील ३६४० घरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय, तहसील
कार्यालय, शासकीय इमारती इत्यादी ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे. तरी कोरोना
प्रतिबंधासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणे व पंढरपूर शहरातील दुषित रुग्णाची घरे जंतूनाशकाव्दारे
फवारणी करण्यात आली. मायकिंगव्दारे पंढरपूर शहरात व उपनगरात किटकजन्य आजार
प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी व आरोग्य शिक्षण देण्यासाठी जाहीर आवाहन व घरोघरी ३०००
हस्त पत्रिकांचे वाटप करण्यात आलेले आहे. शहरातील सर्व नागरिकांना मायकिंगव्दारे
किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत आरोग्य शिक्षण दिले. तसेच जीवशास्त्रीय
उपाययोजनेत अंतर्गत ०५ डासोत्पत्ती ठिकाणा मध्ये गप्पी मासे सोडण्यात आली आहेत. तसेच
पंढरपूर शहरात डेंग्यू चिकुनगुनिया सदृश एकूण २३ रुग्णाच्या ठिकाणी त्वरित प्रतिबंधात्मक
उपाययोजना राबविण्यात आल्या तसेच त्या भागातील नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. सध्या विषाणुजन्य आजाराचे प्रमाण असल्याने व किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी शहारातील व उपनगरातील नागरिकांना व भाविकांना आवाहन करण्यात येते कि, खिडक्यांना जाळ्या लावाव्यात, झोपताना किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा, डास नाशक अगरबत्ती यांचा वापर करावा आपल्या घराचा परिसर, कार्यालयाचा परिसर देखील स्वच्छ ठेवावा, डेंग्यूचा डास हा दिवसा चावत असल्याने अंगभर कपडे वापरावेत घराभोवती साठलेले पाणी, भंगार साहित्य, जुने टायर इत्यादी वस्तूची त्वरित विल्हेवाट लावावी. तसेच आपल्या घरातील सर्व पाण्याची भांडी, पिंप, बरल, सिमेंट टाकी इ. स्वच्छ धुऊन पुसून कोरडी करावीत तसेच आठवड्यातून १ दिवस कोरडा दिवस पाळाया. तसेच आपल्या घरी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचारी यांना सर्व माहिती यावी. तसेच दुषित आढळलेले सर्व कंटेनर त्वरित रिकामे करावेत अथवा टेमीफॉस द्रावण टाकावे. कोव्हीड- १९ नियंत्रणासाठी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोके दुखी इत्यादी लक्षणे आदळून आल्यास त्वरित शासकीय दवाखान्यात उपचार करावेत.
तरी पारेषण कालावधीमध्ये सर्व नागरिकांना व भाविकांना आवाहन करण्यात येते की, सध्या पारेषण कालावधी असल्यामुळे किटकजन्य आजारासाठी पोषक वातावरण आहे, आपल्या घराभोवताच्या परिसरात पाणी साठू देऊ नये, त्या ठिकाणी साठलेल्या पाण्यात रॉकेल, ओईल टाकावे जेणेकरून डासअळ्या नष्ट होतील. तसेच कोव्हीड १९ प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर पाळावे, ताप लक्षणे आढळून आल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात तपासणी करावी असे आवाहन मा. मुख्यधिकारी श्री. अरविंद माळी तसेच मा. प्रांताधिकारी मा. तहसीलदार, मा. जिल्हा हिवताप अधिकारी मा.आरोग्यधिकारी, मा. जीवशास्त्रज्ञ यांचे वतीने करण्यात आलेले आहे.