पंढरपूर येथील सांगोला अर्बन को-ऑपरेटिव बॅकेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
सहकारी बँकेला रिझर्व्ह बॅंकेच्या मर्यादा अनेक आहेत. ज्या कारणासाठी कर्ज घेतले जाते त्याच कारणासाठी ते वापरले जात नाही. व्यवसाय धंद्यात आरटीआय पाहिले जाते. कर्ज घेताना सिव्हिल हे महत्वाचे असते अनेक निकषांवर बॅक कर्ज देते. बँकेने विनातारण कर्ज देण्याचे काम चालू आहे. बँकेच्या नियमानुसार आठ दिवसांत व्यवसाय कर्ज देण्याचे काम सुरू आहे. बँकेवर एकदा पण कारवाई झालेली नाही. सद्या अनेक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. कागदपत्र पाहून याशिवाय माणूस कर्तृत्वान पाहून कर्ज दिले जाते. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाने बॅक चालू आहे भविष्यात ही थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी कर्जदारांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सरकारी बॅकेला सरकार मदत करतात तसे सहकारी बँकेला सरकार मदत करत नाही. बॅक तुमची आहे तुमची जबाबदारी आहे. भविष्यात उत्कृष्ट पद्धतीने बॅक पुढे नेऊ असे आश्वासन यादरम्यान चेअरमन डाॅ. प्रभाकर माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, बाळासाहेब माळी, अशोक जाधव, सुरेश माळी, डाॅ. अरूण मेनकुदळे, उद्योजक गोविंद माळी, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, चंद्रकांत देशमुख, सीईओ राजेंद्र ढमडिरे, बाबुराव गोडसे, नागन्नाथ माळी, शहाजीराव नलवडे, रघुनाथ माळी, शिवाजी गायकवाड, विष्णु लांडगे, अशोक गोडसे, गुलाबराव पोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र ढमडिरे बोलताना म्हणाले, अल्पावधीतच सांगोला अर्बंन को-ऑपरेटिव पंढरपूर शाखेने ४२ करोड ची उलाढाल करून ग्राहकांच्या विश्वास पाञ राहिली आहे. ग्राहकांना सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचे मत राजेंद्र ढमडिरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमची सुरवात मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल प्रतिमेची पुजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आली.
प्रास्ताविक करताना किसन माळी म्हणाले, आर्थिक नियोजन परफेक्ट असून कर्ज वाटप मोठ्या प्रमाणात केले असुन खुप मोठ्या प्रमाणात ठेवी नागरिकांनी ठेवल्या आहेत. खातेदारांनी नियमित व्यवहार करणे आवश्यक आहे. सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून सांगोला अर्बंन को-ऑपरेटिव बँकेची वाटचाल सुरू आहे. ग्राहक मेळावा, सामाजिक उपक्रम राबवत आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये सर्वांचा मोठे योगदान आहे. बँकेने अनेक पुरस्कार घेतलेले आहेत. ६०० कोटीच्या पुढे व्यवहार असलेली बॅक विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचे किसन माळी यांनी सांगितले.
सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सद्या जीवनात टिकायचे असेल तर शाखा विस्तार करणे आवश्यक असुन सांगोला अर्बन को-ऑपरेटिव बँकेने तेच केले. ग्रामीण भागातील विकास बँकेने खुप मोठ्या प्रमाणात केला आहे. सभासदांना वैयक्तिक ओळख देणारी बॅक म्हणून सांगोला अर्बन को-ऑपरेटिव बँकेची ओळख असल्याचे मत डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.
जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, अर्थकारण याशिवाय सद्या जगात काहीच चालत नाही. नीतिमत्ता व चाणक्य नीती खुप महत्वपूर्ण आहे. परसेवा भाव असलेली बँक सांगोला अर्बन को-ऑपरेटिव बॅक आहे. समाजात अर्थकारण चालायचे असेल तर ग्रामीण भागात उद्योजकांना मदत करणे आवश्यक असल्याचे मत बाळासाहेब बडवे यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब माळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, बँकेने वैयक्तिक नाते जोपासले आहे. सर्व सामन्या जनतेच्या हक्काची बॅक असल्याचे मत माळी यांनी व्यक्त केले. यादरम्यान बॅकेच शाखा प्रमुख विकास देशमाने व दत्तात्रय नवले सह यांचा सत्कार संचालक मंडळाकडून करण्यात आला.
सांगोला अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या पंढरपूर शाखेचा स्थलांतर सोहळा व ग्राहक मेळावा
बॅक स्थलांतर सोहळा व ग्राहक मेळाव्यात अनेक ग्राहकांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. ज्ञानेश्वर माळी यांनी केले तर आभार चंद्रकांत देशमुख यांनी मानले.