पंढरपूर पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेले जुने हेंबाडपंती शंभू महादेवाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे, इ.स.
पूर्व काळातील हे मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये अखंड दगडाचे 16 खांब व सहा पिंडी व पार्वतीची मूर्ती आहे हे मंदिर पूर्णपणे अखंड दगडाची असून हे मंदिर दानवांनी एका रात्रीमध्ये बांधले गेले आहे असे म्हटले जाते, मंदिर बांधण्याकरता कुठेही वाळू वीट याचा उपयोग केलेला दिसत नाही, या मंदिराचा उल्लेख पोथी पुराना मध्येही आहे या गावांमध्ये कोठेही खोदकाम केल्यास पिंडी सापडतात, या गावामध्ये कोटीपेक्षा जास्त देव असल्यामुळे या गावाला कोर्ट या गावाने ओळखले जाते, पुर्वी कुर्ती मग सृष्टी असेही म्हटले जात होते श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून भाविक कोर्टीच्या शंभू महादेवाच्या दर्शना करता येतात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते,, भावीक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी नारळाचे तोरण व चांदीचे बेलाचे पान अर्पण करतात तसेच दही ,दूध ,तुप,मध, ऊसाच्या रस,आदीने अभिषेक केला जातो. भाताने पिंड सजवली जाते. भाविक तांदूळ आणून देतात, येतील गुरव यांच्याकडे ते शिजवण्यासाठी दिले जाते .येथील गुरव ते तांदूळ शिजवून दहिभाताने शंकराचे डोळे ,कान ,नाक त्या भाताने करतात नंतर पुजा करून तो पिंडीवरला भात काढतात व प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो.येथील गुरव सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून पूजा, अभिषेक ,आरती नित्य नेमाने करित असतो. पूजा अर्चा करण्याचा मान येथील पुजारी अनिल गुरव शाम गुरव यांच्याकडे आहे. कोर्टी येथील ग्रामस्थ भक्ती भावाने महादेवाच्या मंदिरात आपली सेवा देतात .पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात.