पंढरपूरचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.शितल शहा यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव



पंढरपूर, प्रतिनिधी

पंढरपूरचे प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि नवजीवन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. शितल शहा यांचा गौरव स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांचा गौरव केला. शासनाची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, उत्तम पद्धतीने राबविल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले आहे.

यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्यासह जिल्हास्तरावरील अनेक अधिकारी उपस्थित होते. सहा वर्षात नवजीवन हॉस्पिटलमध्ये शासनाची महात्मा फुले जीवन आरोग्यदायी योजना अत्यंत कुशलपणे राबवून, डॉ. शहा यांनी अनेक लहान मुलांना जीवनदान दिले आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या हॉस्पिटलमध्ये

अनेक किचकट स्वरूपाच्या शस्त्रक्रिया, या योजनेतून त्यांनी पार पाडल्या आहेत. महात्मा फ ले जीवनदायी आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांना कसा होईल, याचा विचार करून त्यांनी आजवर उपचार केले आहेत.

पंढरपूरमधील डॉ. शितल शहा यांनी केलेल्या रुग्णसेवेची दखल शासनानेही घेतली आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. सोमवार दि. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

सध्या सोलापूर आणि इतर दोन जिल्ह्यातून त्यांच्याकडे रुग्णांचा ओढा आहे. अत्यंत प्रशस्त आणि सर्व सोयींनी युक्त असलेल्या या लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर रुग्ण अथवा रुग्णांचे नातेवाईक कोणीही निराश घेतले आहेत.

होऊन जात नाही. किंबहुना त्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास या हॉस्पिटलमध्ये होता कामा नये, अशी खबरदारी डॉ. शितल शहा यांच्याकडून कायमच घेतली जाते. सन २०१६ मध्ये या हॉस्पिटलम ध्ये केंद्र सरकारची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून येणाऱ्या रुग्णांवर उपचार करून, समाधानी ठेवण्याचे काम आजवर डॉ. शितल शहा यांनी केले आहे.

लहान मुलांच्या अनेक किचकट शस्त्रक्रिया या हॉस्पिटलने याच योजनेतून पार पाडल्या आहेत. यामुळे या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक पालक खुश होऊन गेला आहे. डॉ. शितल शहा यांचा नावलौकिक सुरुवातीपासूनच होता. केंद्र सरकारची योजना राबवून त्यांनी अनेक रुग्णांचे आशीर्वाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form