लक्ष्मी टाकळीच्या सरपंचपदी विजयमाला वाळके; उपसरपंचपदी संजय साठे यांची निवड

शहरालगत आणि राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाची निवडणूक समजली जाते


पंढरपूर --(विनोद पोतदार)
पंढरपूर शहरालगत सर्वात मोठी ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी आहे. निवणडणुकीनंतर विजयी उमेदवारातून ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजयमाला सचिन वाळके, तर उपसरपंचपदी उद्योजक संजय साठे यांची निवड झाली. निवडणुकीतील अटीतटीच्या लढती आणि त्यानंतर झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर राज्यातील सत्ताधारी भाजप व शिंदे समर्थक गटांनी एकत्र येत या ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन केली.

साठे कुटूंबातील तिघांनी चार जागांवर विजय मिळविला. त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे इतरही सदस्य निवडून आले. विरोधी परिचारक गटाला ७ जागा मिळाल्या. मात्र, सरपंच निवडीच्या अनुषंगाने सदस्यांच्या पळवापळवीचे राजकारण रंगले. अखेर भाजप नेते, माजी आ. प्रशांत परिचारक आणि मुख्यमंत्री शिंदे समर्थक महेश साठे यांच्या गटांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात  सरपंच, उपसरपंच निवडीनंतर परिचारक व साठे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.यावेळेस प्रथमच साठे, सचिन वाळके बापूसाहेब कदम, सागर कारंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना नेते महेश साठे आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form