पंढरपूर येथे अवैध गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला,१७लाखांचा मुद्देमाल जप्त


पंढरपूर(प्रतिनिधी)
विक्री करण्यासाठी मनाई असलेला विमल आणि आर एम डी गुटख्याची अवैध वाहतूक करीत असलेला टेम्पो पंढरपूर शहर पोलिसांनी भक्ती मार्ग परिसरात पकडला असून वाहनासाहित १७लाख ४हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.एम एच १२-३६३९ या क्रमांकाच्या टेम्पो मधून सदर गुटखा कर्नाटक राज्यातून पुणे येथे जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेस प्राप्त झाली होती,यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन खात्याशी संपर्क साधून कारवाई केली, सदरचा माल हा १०लाख ४हजार रुपयांचा आहे,याप्रकरणी चालक आणि क्लिनर अशा दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून लवकरच अन्य आरोपींना अटक करण्यात येणार आहे, शरीरासाठी अत्यंत घातक असलेला गुटखा, सुगंधी सुपारी तसेच मावा अशा विविध पदार्थाची अवैध विक्री पंढरपूर शहरातील अनेक पान टपरीवर सुरू आहे, अनेक युवक व्यसनाधीन होत असून त्यांची वाटचाल अधोगतीला चालली आहे तर गुटखा, मावा विक्री करणारे लोक बिल्डिंग बांधत आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form