मंगळवेढा---(विनोद पोतदार)
तालुक्यातील 24 गावांना पाणीपुरवठा करण्यारी उपसा सिंचन योजनेला तात्काळ मंजुरी मिळावी म्हणून जलाभिषेक रॅलीचे आयोजन केले व 24 गावांतील ग्रामदैवत यांना जलाभिषेक करण्यासाठी पंढरपूर चंद्रभागा नदी मधून जल घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेत मोटरसायकल वर रॅलीची सुरुवात करण्यात आली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट *सभापती सोमनाथ मालक आवताडे* यांच्या शुभहस्ते जल पूजन करून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार समाधान दादा अवताडे यांनी विधानभवनात मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना पाणीपुरवठा करण्यारी उपसा सिंचन योजनेला तात्काळ मंजुरी मिळविण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याला उत्तर देत एका मिनिटाचा ही विलंब न लावता सात दिवसाच्या आत कॅबिनेट लावून मंजूरी देणार असल्याचे आश्वासन दिले त्या निमित्ताने संघर्ष समितीचे अध्यक्ष *बापूसाहेब मेटकरी व उपाध्यक्ष धनाजी भाऊ गडदे* यांनी जलाभिषेक रॅलीचे आयोजन केले व 24 गावांतील ग्रामदैवत यांना जलाभिषेक करण्यासाठी पंढरपूर चंद्रभागा नदी मधून जल घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेत
ही रॅली चंद्रभागा नदी मधून श्री विठ्ठल मंदिर येथे नामदेव पायरी जवळ जलाभिषेक करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुड पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मंगळवेढ्यातील 24 गावांना पंढरपूर येथून रवाना झाली..
यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.