सोलापूर - (विनोद पोतदार)
येत्या रविवारी सोलापूरात भुलतज्ञांच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. बालाजी सरोवर हॉटेल येथे होत असलेल्या या परिषदेत १५० वर भुलतज्ञ सहभागी होतील ही माहिती सोलापूर भुलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा कविता निवरगी तसेच प्रदेश अध्यक्षा मनिषा काटीकर यांनी दिली. भुलशास्त्र हे प्रगतीशिल शास्त्र असून सातत्यानं नवनवीन संशोधन होत असतात. शस्त्रक्रिया दरम्यान रुग्णाला कोणत्याही वेदना होवू न देता शस्त्रक्रिया पार पाडणं, त्यानंतर त्याला पुर्वतत स्थितीत आणणं ही मोठी कसोटी असते या विषयात होत असलेल्या संशोधनावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वेंकटगिरी, सचिव नवीन मल्होत्रा, अविनाश भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.या पत्रकार परिषदेस वैशाली येमुल, पुष्पा अग्रवाल, वैशाली जोशी ,सोनिया गांधी उपस्थित होत्या