पंढरपूर-----
भारतीय सन ,उत्सव साजरे करताना प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने संस्थापक सचिवा सौ.सुनेत्राताई पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रुक्मिणी विद्यापीठ वर्धापन दिन व श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा दिमाखात साजरा....
गणपती सजावटीची आरास पूर्णपणे मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयाच्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक साहित्य रंगीत कागद व युज थो कागदी कप वापरून फुलांचे तोरण व वेगवेगळे फुले तयार करून करण्यात आली.
श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना संस्थेच्या हितचिंतक सौ बर्गे वहिनी यांचे शुभहस्ते मनोभावे पूजन करून करण्यात आली .
प्रारंभी प्रशालेच्या इमारतीचे सौ.बर्गे यांचे शुभहस्ते पूजन करून
जय श्री गणेशाच्या नामघोशात प्रशालेचे वरिष्ठ लिपिक श्री. जाधव धनाजी यांनी श्री गणेश मूर्ती वाजत गाजत प्रशालेत आणली.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. बर्गे वहिनी म्हणाल्या की भारतीय प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण प्रशालेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करावे तसेच शाळा प्रगतीसाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन सर्वांनी आरोग्य संपत्तीसाठी दररोज व्यायाम करून आपली शारीरिक संपत्ती वाढवण्याचे व विद्यार्थी प्रगती कडे शिक्षकांनी लक्ष देण्याचे आवाहन केले संस्था सचिवा सुनेत्राताई पवार म्हणाल्या की गणेशोत्सव व भारतीय परंपरेतील प्रत्येक सण हे पर्यावरण पूरक साजरे करावेत. गणपती विसर्जन करताना नदी व तलावात न करता मूर्ती दान कराव्यात. प्लास्टिकचा वापर कमी करावा. निर्माल्य गोळा करून नदी तलावात न टाकता निर्माल्य कुंडीत च टाकून पर्यावरणाचा होणारा -हास रोखावा. हवा, पाणी ,ध्वनी यातून होणारे प्रदूषणही प्रत्येकाने रोखावे यासाठी सर्वांनी पुढे येऊन पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास थांबवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी प्राचार्या नंदिनी गायकवाड प्रभारी मुख्याध्यापक संतोष कवडे रुक्मिणी बँक संचालिका सुभद्रा पांढरे सविता लोखंडे यांचे सह विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी डुबल. यांनी केले व सविता लोखंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके. कुमुदिनी सरदार, फरहाना कादरी, मनीषा पाटील. निकिता कदम कार्तिकी पाटील, भक्ती जुमाळे नागनाथ क्षीरसागर, अभिनव क्षीरसागर,यांनी विशेष परिश्रम घेतले