पंढरपूर --(विनोद पोतदार)
पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये काल रात्री पावसाने हजेरी लावली अनेक दिवसापासून पंढरपूर तालुक्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते गणेशाच्या आगमना सोबतच वरून राजांनी आगमन केल्याने पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव सुखावले आहेत.
पंढरपुर तालुका आज
दि. 01/09/2022 रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब- 12 मिमी
पट कुरोली 00 मिमी
भंडीशेगाव 20 मिमी
भाळवणी- 19 मिमी
कासेगाव - 31 मिमी
पंढरपूर- 58 मिमी
तुंगत- 13 मिमी
चळे- 26 मिमी
पुळुज 11 मिमी
आजचा एकूण पाऊस 190 मिमी
------------------------------------
सरासरी पाऊस 21.11 मि.मी.
------------------------------------
महाराष्ट्र मध्ये पावसाने हजेरी लावली काही भागात तर अतिवृष्टीमुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी शासनाने निधी जाहीर केला, अशी परिस्थिती असताना अपवादत्मक म्हणून पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली नव्हती कालच्या पावसाने पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधव आनंदी झाला. वरून राजाचे त्यांनी आभार व्यक्त केले आणि शेतकरी मजूर यांनी आनंद व्यक्त केला.