विठ्ठलाच्या पंढरी नगरीत गणरायाचं जल्लोषात स्वागत........ मंदिरे समितीच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव यांच्या हस्ते



पंढरपूर ----
-भाद्रपद शु ४ श्री गणेश चतुर्थी रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी मंदिरे समिती सदस्य ह. भ. प श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, तहसीलदार पंढरपूर श्री सुशील बेल्हेकर, मंदिरे समिती व्यवस्थापक श्री बालाजी पुडलवाड , मंदिरे समिती कर्मचारी व भाविक उपस्थित होते.


 विठ्ठलाच्या पंढरी नगरीत गणेशोत्सवास मोठ्या धार्मिक आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष सार्वजनिक उत्सवावर निर्बंध होते. यंदा मात्र दुप्पटीनं उत्साह वाढल्याचं दिसत असून रस्त्यावर सकाळपासून गर्दी आहे. ढोल, ताशांच्या निनादात आणि हलग्यांचा कडकडाटात लेझिम पथकं आपले खेळ सादर करीत आहेत.
   

पंढरपूर येथे विविध ठिकाणी गणेश विक्रीचे दुकान सजलेले आहेत सजावटीचे साहित्य व गणेशाची आकर्षक व सुंदर मुर्ती मिळाली पाहिजे म्हणून प्रत्येक गणेश भक्त प्रयत्न करीत असलेला दिसतो.
घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना सकाळपासून होत असून लोक वाजत गाजत श्री गणरायाच्या मूर्ती मिरवणुकीने घेऊन घरी आणत आहेत. त्याची विधिवत प्रतिष्ठापना करीत आहेत. 

अबाल ,वृद्धापासून महिला ,युवा ,युवती यांच्या गणेश आगमनाच्या निमित्ताने उत्साह संचारला आहे विविध शाळा, महाविद्यालय, तसेच ग्रामीण भागातील व शहरी भागातील गणेश मंडळे गणेश मूर्ती खरेदी साठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत एकूणच आज गणेशाचे आगमनाने पंढरपूर नगरी फुलून गेलेली आहे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे त्यातच दुपारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे उत्साहामध्ये भर पडलेली आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form