मंदिर समिती संचलित अन्नछत्र कार्यास २.५०लाखाची देणगी


पंढरपूर ---( विनोद पोतदार )
विठ्ठल व विठ्ठल भक्तांचे नातं याला अन्यन्य साधारण महत्व आहे, विठ्ठलाची भक्ती भजन, कीर्तन, प्रवचन, दरमहा वारी ,अखंड नामस्मरण, ग्रंथ वाचन , प्रदक्षिणा, अशा अनेक विविध मार्गाने विठ्ठलाची सेवा विठ्ठल भक्त वारकरी हरिभक्त पारायण महाराज मंडळी व सर्वसामान्य माणूस विठ्ठलाच्या सेवा करीत असतो .

तन मन धन अर्पण करून विठ्ठलाची सेवा करणारे अनेक विठ्ठल भक्त वारकरी आहेत
अशाच  एका विठ्ठल भक्ताने विठ्ठलाच्या सेवेसाठी २ लाख ५० हजार रुपयाची देणगी देऊन सहकार्य केले आहे या विठ्ठल भक्तांचे नाव अभय विश्वासराव रानडे ,राहणार नागपूर आहे. यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती संचलित अन्नछत्र कार्यास ही देणगी दिली  त्यावेळी त्यांचा मंदिर समितीचे संचालिका शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते  श्री ची प्रतिमा,शाल, श्रीफळ, उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form