गणपतीची प्रतिष्ठापना जाणून घ्या शुभ मुहूर्त

       एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार आला रे आला गणपती आला

पंढरपूर---(विनोद पोतदार)
गणेश चतुर्थी  आज बुधवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4 वाजून 48 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करावी.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पहाटेच्या ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल.

त्याकरिता भद्रादी कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही, असे दाते पंचागकर्तेचे मोहन दाते यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form