भाळवणी प्रतिनिधी -
सहकार शिरोमणी सहयोग ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि, कारखान्याचेवतीने मागील गळीत हंगाम 2025-2026 मध्ये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दिपावली सणानिमित्त् मोफत साखर वाटपाचा शुभारंभ जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे यांचे शुभहस्ते कारखाना साईट भाळवणी येथे करण्यात आला.
ओंकार उद्योग समुहाचे सर्वेसर्वा बाबुरावजी बोत्रे-पाटील व सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी एन दुष्काळ परिस्थितीत कारखान्याचे सभासद यांना सवलतीच्या दरात व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मोफत साखर वाटपाचे धोरण निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, दिपावलीचा सण आनंदाने साजरा करण्यास आर्थिक मदत होणार असल्याचे यावेळी जनरल मॅनेजर यांनी सांगितले. हिंदु धर्मातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिपावली सणामध्ये दृष्काळ पडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, मोफत साखर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होवुन, त्यांना आर्थिक आधार मिळाला असल्याचे सांगुन, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सर्व ऊस उत्पादक सभासद, अनामतदार शेतकऱ्यांना घरपोच साखर कुपन वाटप करण्यात आले असून, कारखान्याचे सभासद, भाग अनामतदार यांना प्रत्येकी 50 किलो साखर प्र.किलो रु.27/- सवलतीच्या दरात कारखाना साईटवर व वाखरी येथील एमआयटी समोरील साखर विक्री केंद्रातुन दि.02/11/2026 ते 20/11/2026 या कालावधीत सकाळी 9.30 ते सायं.5.00 पर्यत करण्यात येत आहे.
- मागील गळीत हंगाम 2025-26 मध्ये कारखान्यास गळीतास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खालील धोरणाप्रमाणे कारखाना साईटवरुन गटवाईज मोफत साखर वाटप
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि चालु हंगामामध्ये आपला संपुर्ण ऊस गळीतास देण्याचे आवाहन केले.
1 ते 30 मेटनास प्रत्येकी 10 किलो, 31 ते 50 मे.टनास प्रत्येकी 20 किलो, 51 ते 100 मे.टनास प्रत्येकी 30 किलो, 101 ते 150 मे.टनास प्रत्येकी 40 किलो, 151 ते 200 मे.टनास प्रत्येकी 50 किलो, 201 ते 300 मे.टनास प्रत्येकी 70 किलो व 300 मेटनापेक्षा जास्त् ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना 100 किलो साखर मोफत वाटप करण्यात येत आहे.
नोव्हेंबर, 2 ते 3 तारखेपर्यत भाळवणी व वाखरी गट, 4 ते 5 तारखेपर्यत कासेगांव, करकंबगट व 6 ते 7 तारखेपर्यत तुंगत, सांगोला, माळशिरस, माढा, मंगळवेढा, मोहोळ व इतर गट याप्रमाणे गटवाईज कुपन धारकांनी साखर कारखाना साईटवरील साखर वाटप केंद्रातुन कुपन व ओळखपत्र दाखवुन मोफतची साखर घेण्यात यावी.
जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे
यावेळी कारखान्याचे केन मॅनेजर दादासो देशमुख, डिस्टीलरी मॅनेजर रामचंद्र शेवाळे, चिफ इंजिनिअर अजिनाथ बनकर, चिफ केमिस्ट् मोहन पवार, चिफ अकौंटंट विजय तंडे, एच.आर.मॅनेजर युवराज भंडारे, इले.मॅनेजर दिलीप सुतार, कार्यालयीन अधिक्षक चांगदेव चव्हाण, ईडीपी मॅनेजर सुनिल बार्ले, गोडावुन किपर तेजस धर्माधिकारी, परचेस ऑफिसर निखील कोठावळे, स्टोअर किपर जावेद मुजावर, ऊस पुरवठादार सभासद शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
