पंढरपूर अन्नधान्य पुरवठा विभागा विरोधात आमरण उपोषण करणार - गणेश ढोबळे

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर अन्न व धान्य पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे सामान्यत पाञ नागरिकांना शासनामार्फत मोफत दिल्या जाणाऱ्या धान्यापासून वंचित ठेवत असून जे नागरिक या योजनेस पाञ नाहीत अशा नागरिकांना माञ धान्य मिळत आहे मग हे नेमके घडत कसे तर एजंटांमार्फत पाञ नसलेली प्रकरण खाजगी अनुदान घेऊन ती मंजूर करून घ्यायची आणि सदर योजनेस पाञ असलेल्यांना नियमांवर बोट ठेवत शहरातील नागरीकांना ४४,००० रूपयांचा व ग्रामीण मधिल लोकांना ५९,००० रूपयांचा तलाठी दाखला पाहिजे म्हणून सांगणे रेशन दुकानदाराचा धान्यास पात्र अपात्र असल्याचा दाखला घेऊन येण्यास सांगणे व जे धान्यास पाञ नाहीत त्यांना माञ यापैकी कोणत्याही कागदपत्रांन शिवाय शासकीय नियम व अटींचे उल्लंघन करून हे पंढरपूर अन्न व धान्य पुरवठा निरीक्षण अधिकारी धान्य मिळवून देत असल्याचे दिसून येत आहे जे मजुरीकाम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत ते माञ धन्यापासून वंचित आहेत तर जे आयकर भरत आहेत श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे पाच-पाच दहा एकर जमिनी लाखो रूपये किमती असलेल्या गाड्या आहेत अशांना मात्र शासनामार्फत दिले जाणारे मोफत धान्य मिळत आहे त्यामुळे या पंढरपूर अन्नधान्य पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराची सोलापूर जिल्हाधिकारी यांनी त्वरित चौकशी लावावी या विभागाचे पुरवठा निरीक्षण अधिकारी यांची तातडीने बदली करावी व जे या योजनेचे खरे पात्र नागरिक आहेत त्यांना या योजनेत समाविष्ट करून घ्याव व शासकीय नियमानुसार जे पात्र नसतील परंतु ते पात्र झाले आहेत त्यांना त्वरित अपात्र कराव या मागणीसाठी पंढरपूर जनशक्ती संघटना तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे हे सोमवार दि. 02/11/2026 पासून मागण्या मान्य होईपर्यंत पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती एका लेखी निवेदनाव्दारे पंढरपूर तहसिलदार सचिन लंगुटे यांना गणेश ढोबळे यांनी दिली पंढरपूर पुरवठा निरीक्षक विजय बादल यांच्याबाबत अनेक नागरिकांच्या व काही रेशन दुकानदारांच्याही विविध तक्रारी असूनही सोलापूर जिल्हा पुरवठा पडोळे हे त्यांना का पाठीशी घालत आहेत अता जो पर्यंत पंढरपूर पुरवठा विभागाचे निरीक्षक विजय बादल यांची बदली होईपर्यंत पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार -गणेश ढोबळे जनशक्ती संघटना पंढरपूर तालुकाध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form