स्वामीज्ञ फाउंडेशनतर्फे ११० विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबिर

चौक, ता. खालापूर (जि. रायगड) : स्वामीज्ञ फाउंडेशन, चौक आणि आस्तान-ए-कंलदर, कोथरूड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सौ. पुजाताई जगदीश हातमोडे आणि सौ. अंजली अरुण घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रा. जि. परिषद आदर्श शाळा (दगडी शाळा), चौक येथे विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परफेक्ट स्माईल डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, चौक यांच्या सहकार्याने सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन सौ. पुजाताई जगदीश हातमोडे, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत चौक आणि सौ. अंजली अरुण घोडके, संस्थापक अध्यक्षा, स्वामीज्ञ फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. अलका वीरभद्र, सरिता चौधरी, वत्सला बैलामारे, श्री. नाना साखरे, यशवंत सकपाळ सर, अनिल खंडागळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नाईक सर, आरती नाईक मॅडम, आफरीन पठाण मॅडम, प्रियंका टेकाळे मॅडम यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
चौक, नवीन वसाहत आणि तुपगाव येथील ११० विद्यार्थ्यांना लाभ या शिबिरात चौक, नवीन वसाहत आणि तुपगाव येथील शाळांमधील एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करण्यात आली. तसेच दातांची स्वच्छता कशी राखावी, योग्य मौखिक आरोग्याच्या सवयी कोणत्या आणि दातांच्या आजारांपासून बचाव कसा करावा, याबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन करून जनजागृती केली. या उपक्रमासाठी डॉ. स्नेहा अशोक पटेल आणि डॉ. सुरभी जैन यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच आस्तान-ए-कंलदर, कोथरूड, पुणेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दत्ता भाऊ गुंजाळ यांनीही मोलाचे सहकार्य केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वामीज्ञ फाउंडेशनचे संस्थापक कार्याध्यक्ष श्री. अरुण लक्ष्मीबाई राजाराम घोडके आणि श्री. सुदेश महागावकर यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि लहान वयातच आरोग्यदायी सवयी लागाव्यात, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्वामीज्ञ फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form