श्री.मोहनराव शंकरराव पोतदार गुरुजीं यांना 75 व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विशेष....
*ज्ञानसाधनेचा वारसा आणि सुसंस्कारी गोकुळ : अमृतमहोत्सवी पोतदार गुरुजींचा आदर्श जीवनप्रवास.*
शिक्षण ही केवळ उपजीविका नसून समाज घडवण्याची एक पवित्र साधना आहे. याचा जीवंत प्रत्येय म्हणजेच इचलकरंजी येथील नगरपालिका प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. मोहनराव शंकरराव पोतदार गुरुजीं. येत्या 9 नोव्हेंबर रोजी गुरुजीं आपल्या आयुष्याची 74 वर्षें यशस्वीरित्या पूर्ण करून 75 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या संपूर्ण कौटुंबिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रवासाचा वेध घेणे म्हणजे एका आदर्श जीवन पद्धतीचा गौरव करण्यासारखे आहे. पोतदार गुरुजींचे जीवन म्हणजे केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाहीं. तर तो ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्वाचा एक महामेरू आहे.
*वारसा गुरुत्वाचा : पिढ्यानंपिढया चाललेली ज्ञानसाधना.*
पोतदार गुरुजींच्या व्यक्तिमत्वाला लाभलेली वैचारिक समृद्धी आणि शिक्षकी पेशाची ओढ ही त्यांना घरातूनच वारसा हक्काने मिळाली. त्यांचे वडील आदरणीय श्री शंकरराव पोतदार हे स्वतः एक आदर्श शिक्षक होते . वडिलांच्या छत्रछायेखाली आणि त्यांच्या संस्कारातूनच मोहनराव गुरुजींनी शिक्षकीं पेशाचे बाळकडू घेतले. वडिलांनी लावलेले ज्ञानाचे, मोहनराव गुरुजीं रोपटे केवळ जगवले नाही तर त्याचा एक मोठा वटवृक्ष केला.एका शिक्षकाच्या घरात जन्म घेऊन स्वतः आदर्श शिक्षक बनून समाजातील हजारो विध्यार्थ्याना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य त्यांनी आयुष्यभर केले. हा ज्ञानदानाचा वारसा त्यांच्या आयुष्याचे सर्वात मोठे वैभव आहे.
*कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आणि आदर्श जोडीदार* -
इचलकरंजी नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करताना पोतदार गुरुजींनी केवळ प्रशासकीय जबाबदारी सांभाळली नाही तर प्रत्येक विध्यार्थ्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे माया लावली. गरिबातील गरीब घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट इचलकरंजीकर कधीही विसरणार नाहीत.
या प्रवासात त्यांना त्यांच्या अर्धांगिनी सौ. अरुणा पोतदार यांची मोलाची साथ लाभली. सौ अरुणाताई याही इचलकरंजीतील रोटरीच्या मूक बधिर शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. जेंव्हा पती आणि पत्नी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदावर कार्यरत असतात, तेंव्हा घराचे रूपांतर एका विद्यापीठात होते. दोघांनीही मिळून हजारो मुलांचे भविष्य घडवले आणि त्याचवेळी स्वतःच्या संसारालाही एक आदर्श दिशा दिली. शिक्षण क्षेत्रातील या दाम्पत्याचे योगदान अतुलनीय आहे.
*कर्तृत्ववान मुले : संस्काराचे सुवर्णफळ*--
मुलांचे यश हेच आई वडिलांच्या संस्काराचे मोजमाप असते. असे म्हटले जाते. पोतदार गुरुजीं आणि अरुणाताई यांनी आपल्या मुलावर केलेले संस्कार आज त्यांच्या यशातून लखलखत आहेत. या दाम्पत्याने आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात अत्यंत प्रतिष्ठित स्थानी पोहोचवले आहे.
*अमोल पोतदार --* गुरुजींचा मोठा मुलगा अमोल हा इंजिनियर असून सून सौ पल्लवी आपल्या कुटुंबासह इचलकरंजीतच राहतो. आणि येथेच नोकरी करतात आणि स्थानिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणे हे अमोल अत्यंत जबाबदारीने पार पाडत आहे.
*योगेश आणि सौ. सरिता पोतदार ---* लहान मुलगा योगेश आणि सून सौ. सरिता हे दोघेही पुण्यात इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. आय टी आणि कॉर्पोरेट जगतात अत्यंत व्यस्त असतानाही ते आपल्या कौटुंबिक मूल्याशी घट्ट जोडलेले आहेत.शिवाय योगेशचा हिंजवडी येथे भागीदारीत आलिशान हॉटेलचा व्यवसायही आहे.
*डॉ. सौ. वैशाली --* गुरुजींची कन्या वैशाली हिने वैद्यकीय क्षेत्रात नांव कमावले आहे. ती एम. डी. ( आयुर्वेद ) असून तीचा स्वतःचा यशस्वी दवाखाना आहे. रुग्णांची सेवा करतानाच ती पोतदार कुटुंबाची कन्या म्हणून घराचा वैभव वाढवत आहे.
*नावाप्रमाणेच सजलेले आनंदी 'गोकुळ ' --*
आजच्या धावपळीच्या आणि विभक्त कुटुंबाच्या काळात पोतदार गुरुजींचे घर मात्र एका खऱ्या खुऱ्या ' गोकुळ ' सारखे भासते. घरात दोन नातू आणि दोन नाती आहेत. मुलामुलींच्या या चार सुसंस्कारी अपत्याच्या किलबिलाटाने पोतदार गुरुजींचे अंगण नेहमी प्रसन्न असते. जेंव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येते तेंव्हा घरात चैतन्य पसरते. 75 वर्षें समाजाला ज्ञान देणाऱ्या पोतदार गुरुजींना आपल्या नातवंडांना खेळवताना मिळणारा आनंद हा स्वर्गाहूनही मोठा आहे. आज त्यांच्या घरात " आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे " अशीच परिस्थिती आहे.
*कृतज्ञता आणि शुभेच्छा -*
आयुष्याच्या 74 व्या वर्षांपर्यंत मोहनराव गुरुजींनी जो प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती आणि प्रेम जपले. त्याचेच फळ आज त्यांना लाभत आहे. एक आदर्श मुलगा, एक कर्तव्यदक्ष पती, एक प्रेमळ पिता, एक मायाळू आजोबा आणि समाजाचा एक मार्गदर्शक शिक्षक अशा सर्वच भूमिका पोतदार गुरुजीनी 100% यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
9 नोव्हेंबर रोजी सुरु होणारे त्यांचे 75 वे वर्ष त्यांच्या आयुष्यात अधिक आरोग्य, सुख आणि समृद्धी घेऊन येवो. त्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी पोतदार आणि त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येक कुटुंबाला पुढील अनेक पिढ्या मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
*आ. श्री. मोहनराव शंकरराव पोतदार गुरुजीं यांना 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल कोटी कोटी सदिच्छा.*
-- *वसंत पोतदार, सोलापूर.*--
मोबा. 9423065915

