दिवाळीच्या आनंदात सर्वाना सहभागी करून घेणारा धोत्रे दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम !
पंदरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते दिलीपबापू धोतत्रे यांच्या सामाजिक बांधिलकीतून प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांना दिवाळीच्या निमित्ताने मोफत दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. दिलीपबापू धोत्रे यांच्या पत्नी आणि प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका सौ. माधुरीताई दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या दिवाळी किटमध्ये नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून किराणा साहित्य, साबण, तेल, रवा, मैदा, चकली पीठ, बेसन, पोहे, शेगदाणे, चुरमुरे, डाळडा, मीठ, विविध फराळाचे साहित्य तसेच फटाक्यांचे किट अशा आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक कुटुंबाला दिवाळीचा सण आनंदांने, उत्साहात साजरा करता यावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उदेश असल्याचे दिलीपबापू धोत्रे यांनी सांगितले.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त नेहमीच सर्व समाजघटकांना सोबत चेऊन सण-उत्सव साजरे करण्याची धोत्रे कुटुंबाची परंपरा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विकासकामे करणेच नव्हे, तर नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदत करणे आणि आनंदाच्या क्षणात त्यांच्यासोबत सहभागी होणे, ही आमची भूमिका असल्याचे माधुरीताई धोत्रे यांनी नमूद केले.
प्रभागातीया नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे. समाजातील सर्व घटकांचा विचार करून दरवर्षी सण-उत्सवाच्या निमित्ताने दिला जाणारा हा आधार खरंच कौतुकास्पद असून, यामुळे गरजूंना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
