उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन, सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.-- भगीरथ भालके

पंढरपूर प्रतिनिधी- ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ दादा भालके यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थीतीनिर्माण झाल्याने बळीराजा शेतकरी मोठया अडचणीत सापडला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांसह पशुपालकांच्या अडचणीही वाढल्या असून जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पिकांची पेरणी केली. मात्र पेरणीनंतर अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणी, बियाणे, खते, औषध फवारणी आणि मशागतीसाठी केलेला खर्च आधीच शेतकऱ्यांच्या माथी आला असून उत्पादन हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सरसकट पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच जनावरांसाठी चारा आणि नागरिक व पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यक व्यवस्था करावी, तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा शेतीसोबत पशुपालन हा महत्त्वाचा आधार असल्याने चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. हिरवा चारा उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी झाल्याने पशुपालकांसमोर जनावरांच्या संगोपनाचे आव्हान निर्माण झालेले आहे. जनावरांसाठी चारा छावणी उभारणे देखील गरजेचे आहे असे ही भगीरथ दादा भालके यांनी निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form