पंढरपूर कृषी बाजार समितीची ६६० कोटींची उलाढाल

कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी -- पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती हरीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीत तब्बल ६६० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून, समितीचा देशातील उच्चतम बाजार समित्यांमध्ये समावेश करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती या सभेत देण्यात आली.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती हरीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीत तब्बल ६६० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून, समितीचा देशातील उच्चतम बाजार समित्यांमध्ये समावेश करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती या सभेत देण्यात आली. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती हरीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीत तब्बल ६६० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून, समितीचा देशातील उच्चतम बाजार समित्यांमध्ये समावेश करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती या सभेत देण्यात आली.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली.यावेळी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. सचिव कुमार घोडके यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. बाजार समितीच्या बँकेतील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना अधिक सुविधा देऊन व्यापारवाढ साधण्यासाठी आवश्यक ती सर्व विकासकामे प्राधान्याने पूर्ण केली जात असल्याचे सभापती हरीष गायकवाड यांनी सांगितले. या प्रसंगी उपसभापती राजू गावडे, दिनकर मोरे, कल्याणराव पाटील, लक्ष्मणराव धनवडे यांच्यासह सर्व संचालक, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. चौकट -- बाजार समितीला ५ कोटी ४२ लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असून, सर्व खर्च वजा जाता २ कोटी ४८ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.एकूण उलाढालीत सर्वाधिक वाटा बेदाण्याचा (५०१ कोटी) राहिला. या व्यतिरिक्त डाळिंब (६० कोटी), फळे व भाजीपाला (४२ कोटी), भुसार धान्य (२३ कोटी), कांदा (२३ कोटी), केळी (६ कोटी), जनावरे (४ कोटी) आणि वैरण (१ कोटी) अशी उलाढाल नोंदवली गेली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form