श्री विठ्ठल कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

४५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व मोळी पुजन कार्यक्रम संपन्न
सहकारातुन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील आमदार अभिजीत धनंजय पाटील
पंढरपूर प्रतिनिधी - श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याची अधिमंडळाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २६.०९.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत धनंजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
तसेच श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा सन २०२६-२७ गळीत हंगामाचा ४५ वा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभशनिवार दिनांक २६.०९.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जगदगुरु संत श्री तुकोबाराय यांचे वंशज ह.भ.प.प्रा. श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांचे शुभहस्ते व होम पुजन श्री अमोल अभिमान शेळके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुरेखा, कारखान्याचे संचालक श्री जनक माणिक भोसले त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्नेहल, कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीतआबा पाटील, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर सपन्न झाला. तसेच सन २०२६-२७ चा ४५ वा गळीत हंगामाचा शुभारंभ श्री विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन श्री दिनकर दत्तात्रय पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अरुणा यांचे शुभहस्ते कलश पुजन होवून उपस्थित कारखान्याचे जेष्ठ सभासद यांचे शुभहस्ते, कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीतआबा पाटील, व्हा. चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, मार्गदर्शक स्वेरी शैक्षणिक संकुलाचे सचिव प्रा.बी.पी.रोंगे सर, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड तसेच शेतकरी, सभासद, तोडणी वाहतुक ठेकेदार, अधिकारी व कामगार यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक, श्री डी. आर. गायकवाड यांनी विषय पत्रीकेवरील विषयांचे वाचन केले. या सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मतांनी व हात उंचावून मंजूरी दिली. अधिमंडळाच्या ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांनी सन २०२५-२०२६ हंगामाचा अहवाल सादर केला. यावेळी सभासदांच्या लेखी प्रश्नांची उत्तरे देताना मागील व चालू आर्थिक स्थिती व अडचणीचे विस्तृत विवेचन करुन सभासदांच्या सर्व प्रश्नांची व शंकेचे निरसन केले. आपले कारखान्याचे आसवनी प्रकल्पामध्ये सुधारणा करुन १०० के.एल.पी.डी. क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरु केलेले होते, परंतु शासनाकडून इथेनॉल धोरण बंद केल्याने अडचण निर्माण झाली आहे. केंद्र शासनाचे धोरणामध्ये साखरेची किंमत कमी व ऊसाची किंमत जास्त अशी तफावत असले कारणाने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. याकरिता साखरेचे किमान विक्री मुल्य (एम.एस.पी.) ४७०० ते ४८०० असणे गरजेचे असल्याचे सांगीतले. आपले कारखान्यामार्फत श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयाची शासनाची मंजुरी मिळालेली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ पासून प्रत्यक्ष सुरु झालेले आहे. यासाठी विशेष करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, कृषि मंत्री मा.श्री दत्तात्रय भरणे साहेब यांचे यासाठी सहकार्य लाभले. तसेच हंगाम २०२४-२५ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला रु.३५००/- दर देणेचे जाहिर करण्यांत आलेला होता. त्यापैकी आजवर प्र.मे.टन रु.३००३/- अदा केलेले असून उर्वरीत रकमेपैकी माहे जानेवारीमध्ये जाहीर केलेनुसार रु.१००/-दिपावली सणासाठी अदा करणार असल्याचे सभासदांना सांगितले असून, उर्वरीत रक्कम टप्याटप्याने अदा केले जातील असे सांगितले. उपस्थितीत सभासदांनी आजवर कारखान्यास व संचालक मंडळास दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करुन येणाऱ्या गळीत हंगामासाठी इतर कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता १०० टक्के ऊस आपल्याच कारखान्याला पाठवावा, असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form