आदर्श शिक्षक पुरस्काराने शशिकांत पोतदार सन्मानित

पंढरपूर प्रतिनिधी -- गाव-वाडी- वस्तीवरील शाळातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक अधिकचे प्रयत्न करत असतात, शिक्षक गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण देतात अशा आदर्श शिक्षकांचा तसेच उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान सोहळा बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा सद्गुरू मंगल कार्यालय,वाखरी येथे आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटे वस्ती क्र.१ येथील उपक्रमशील शिक्षक शशिकांत पोतदार यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक रामभाऊ यादव यांनी केले राज्य संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे यांच्या शुभ हस्ते व पतसंस्थेचे चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी संघाचे सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती क्षीरसागर व विजय जवळेकर आणि राजकुमार जमदाडे यांनी केले व आभार बालाजी जमदाडे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form